Nana Patole on Pulwama Attack : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी पुलवामा हल्लाप्रकरणावर (Pulwama Attack) मोठा गौप्यस्फोट केल्याने देशात एकच खळबळ माजली असताना,आता महाराष्ट्र कॉग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole)यांनी खळबळजनक दावा केला आहे. पुलवामा हल्ल्यात जी 300 किलोची स्फोटके वापरण्यात आली, ही स्फोटके नागपूरमधून गेल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे.त्यांच्या या दाव्यानंतर आता महाराष्ट्रात मोठी खळबळ माजली आहे.(rdx used in pulwama sent from nagpur says congress leader nana patole)
ADVERTISEMENT
हे ही वाचा : महाराष्ट्रात राजकारण पेटलं, 12 श्री सदस्यांच्या मृत्यूवर अखेर आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सोडलं मौन
रविवारी नागपूरात महाविकास आघाडीची ( Maha vikas Aghadi) वज्रमुठ (vajramuth) सभा पार पडली होती. या सभेत नाना पटोले (Nana Patole) यांनी पुलवामा हल्ल्यावर मोठं विधान केले होते. पुलवामात जो हल्ला झाला, या हल्ल्यात 300 किलोची स्फोटके वापरण्यात आली होती. ही स्फोटके नागपूरमधून गेल्याचा दावा नाना पटोले यांनी या सभेत केला. विशेष म्हणजे,या प्रकरणाची तपास सीबीआय लावली होती.या घटनेला आता साडे तीन-चार वर्ष उलटले आहेत. मात्र नागपूरमधून जी स्फोटके गेली होती, ती कुठून गेली? कोण पाठवणारा होता, याची अद्याप चौकशी झाली नाही, अशी माहिती पटोले यांनी दिली.तसेच ही परिस्थिती भयावह असल्याचेही त्यांनी सांगितले.
सत्यपाल मलिक काय म्हणाले होते?
जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी मोदी सरकारच्या चुकीमुळं पुलवामा हल्ला झाल्याचे वक्तव्य केले होते. पुलवामामध्ये CRPF ने एअरक्राफ्ट मागितले होते. कारण इतका मोठा ताफा कधी रोडवरून जात नाही. या संदर्भात गृह मंत्रालयाला विचारले होते, मात्र त्यांनी नकार दिला होता,असे सत्यपाल मलिक यांनी द वायरच्या मुलाखतीत सांगितले होते. जर मला विचारण्यात आले असते, तर मी कसे करून त्यांना दिले असते. फक्त पाच एअरक्राफ्टची गरज होती. पण त्यांना एअरक्राफ्ट दिले गेले नाही, असे मलिक यांनी सांगितले.
हे ही वाचा : महाराष्ट्र भूषण सोहळ्यात राजकीय स्वार्थ होता.. दुर्घटनेनंतर राज ठाकरेंची थेट प्रतिक्रिया
ही गोष्ट मी पंतप्रधान मोदींना सांगितली होती. आपल्या चुकीमुळे ही घटना घडलीय, जर एअरक्राफ्ट दिले असते, तर ही घटना घडलीच नसती. तर पंतप्रधानांनी मला गप्प राहण्याचे निर्देश दिले होते, असा गौप्टस्फोट त्यांनी केला होता.
ADVERTISEMENT