VIDEO: ..अन् चक्क नारायण राणेंनी हात जोडले, असं घडलं तरी काय?

मुंबई तक

08 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 04:52 PM)

Narayan rane directly folded his hands: मुंबई: एकीकडे शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज (8 मार्च) विधिमंडळात आलेले असताना दुसरीकडे ते त्यांचे कट्टर वैरी समजले जाणारे आणि भाजपचे (BJP) मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे देखील विधिमंडळात आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेटही घेतली. ज्यानंतर नारायण राणेंनी पत्रकारांशी संवादही […]

Mumbaitak
follow google news

Narayan rane directly folded his hands: मुंबई: एकीकडे शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज (8 मार्च) विधिमंडळात आलेले असताना दुसरीकडे ते त्यांचे कट्टर वैरी समजले जाणारे आणि भाजपचे (BJP) मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे देखील विधिमंडळात आले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेटही घेतली. ज्यानंतर नारायण राणेंनी पत्रकारांशी संवादही साधला. मात्र, यावेळी एका प्रश्नावर प्रतिक्रिया देण्याऐवजी नारायण राणेंनी चक्क कॅमेऱ्यांसमोर हातच जोडले. यावेळी नेमकं काय झालं हे आपण सविस्तर जाणून घेऊया. (reacting to the talk of uddhav thackeray becoming prime minister narayan rane directly folded his hands and saluted)

हे वाचलं का?

पत्रकारांशी बोलताना नारायण राणेंनी सुरुवातीला शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर प्रचंड टीका केली. शिवसेना विषय महाराष्ट्रातून संपला आहे.. त्यांचं दुकान बंद झालं आहे. असं नारायण राणे झाले. पण यापुढे जेव्हा पत्रकारने ज्या प्रश्नावर प्रतिक्रिया विचारली तेव्हा राणेंनी चक्क हातच जोडले.

नारायण राणे म्हणाले ‘उभं राहायलाही दोन माणसं लागतात’; उद्धव ठाकरेंनी सोडलं मौन

नारायण राणेंनी हात का जोडले?

‘शिवसेनेत आता काय राहिलंच नाही. 40 जाताना उघड्या डोळ्याने सैनिक पाहू शकत होते का? मी असेपर्यंत शिवसेनेतून बाहेर पडायची कोणाची हिंमत होती का? त्यामुळे शिवसेना विषय महाराष्ट्रातून संपला आहे.. दुकान बंद झालं आहे.. आता लवकर लॉकआऊट होईल.’ असं राणे सुरुवातीला म्हणाले.

त्यावेळी राणेंना एक प्रश्न विचारण्यात आला की, उद्धव ठाकरे हे पंतप्रधान होतील अशी चर्चा सध्या सुरू आहे. हा प्रश्न विचारताच नारायण राणे हे सुरुवातीला हसले आणि जाऊ..दे जाऊ..दे म्हणत त्यांनी मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोरच हात जोडले.

पुढे राणे म्हणाले की, ‘हा म्हणजे कहर आहे.. विधिमंडळात न येता.. मातोश्रीवर बसून राहिले आणि तो पंतप्रधान.. अरे काय जेवण आहे का? ही चेष्टा आहे त्या पदाची..’ अशा शब्दात नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंची हेटाळणी केली.

Ramdas Kadam: “नारायण राणे गेले तेव्हा तुमची #@ पिवळी झाली”, ठाकरेंवर वार

पाहा नारायण राणे नेमकं काय-काय म्हणाले.

‘आता शिवसेना संपलीय.. काही राहिलेलं नाही. उरलेले १५ पण त्यांच्या हाताशी राहत नाही निवडणुकीपर्यंत. उद्धव ठाकरेची ताकदच नाही.. मंत्रालयात यायची ताकद नव्हती तर महाराष्ट्र पिंजून काढणार? शक्य आहे का..’ अशा शब्दात राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

‘अरे.. उद्धव ठाकरेला बोलताना त्रास होतो.. 20 पावलं चालू शकत नाही आणि घणाघात? वाघ वैगरे दाखवायचं.. अरे कशाला.. ते वय नाही राहिलं आता. त्या वयात पण काही करू शकले नाही. शिवसेना जी घडली त्यामध्ये उद्धव ठाकरेने कोणाला कानाखाली पण नाही मारली. हा त्यांचा इतिहास आहे.’ असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली.

‘तेव्हा’ नारायण राणे चेंबूरच्या नाक्यावर कोंबडी कापत होते : विनायक राऊत यांचा हल्लाबोल

    follow whatsapp