Govt Job: सरकारी नोकरी, भरघोस पगार... मुंबई विद्यापीठात 152 जागांसाठी भरती!

रोहिणी ठोंबरे

09 Jul 2024 (अपडेटेड: 09 Jul 2024, 05:25 PM)

job Vaccancy 2024 : मुंबई विद्यापीठात एकूण 152 जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 07 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई विद्यापीठात एकूण 152 जागांसाठी नोकरीची संधी आहे.

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 07 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

point

नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.

Mumbai University job Vaccancy : मुंबई विद्यापीठात एकूण 152 जागांसाठी नोकरीची संधी आहे. विद्याशाखांचे डीन या पदासाठी 04 जागा, प्राध्यापक पदासाठी 21 जागा, सहयोगी प्राध्यापक/ उप ग्रंथपाल या पदासाठी 54 जागा तर, सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल या पदासाठी 73 जागा आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 07 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. तर अर्ज सादर करण्याचा पत्ता रजिस्ट्रार, मुंबई विद्यापीठ, खोली क्रमांक 25, फोर्ट, मुंबई-400032 आहे. (recruitment govt job 2024 for 152 seats in mumbai university)

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारे उमेदवार, 

  • पद क्र.1- 1) संबंधित विषयात Ph.D. /55% गुणांसह  पदव्युत्तर पदवी 2) पुस्तके आणि संशोधन/पॉलिसी पेपर म्हणून 10 प्रकाशने 3) 15 वर्षे अनुभव

  • पद क्र.2- 1) संबंधित विषयात Ph.D. 2) पुस्तके आणि संशोधन/ पॉलिसी पेपर म्हणून 10 प्रकाशने 3) 10 वर्षे अनुभव
  • पद क्र.3- संबंधित विषयात Ph.D+55% गुणांसह पदव्युत्तर पदवी+ पुस्तक 07 प्रकाशने+ 08 वर्षे अनुभव+NET/ SET  किंवा ग्रंथालय विज्ञान/ माहिती विज्ञान/ दस्तऐवजीकरण विज्ञान पदव्युत्तर पदवी + 08 वर्षे अनुभव
  • पद क्र.4- 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी+NET/SET किंवा ग्रंथालय विज्ञान/माहिती विज्ञान/दस्तऐवजीकरण विज्ञान पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. 

हेही वाचा : Worli Accident : 'गरीब रोज असेच रस्त्यावर मरतील', कावेरी नाखवांच्या पतीचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किती असावे याबाबत कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही आहे. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.

शुल्क

  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 500 रूपये शुल्क आकारले जात आहे.

  • तर, मागासवर्गीय कॅटेगरीतील उमेदवारांकडून 250 रूपये शुल्क आकारले जात आहे.

हेही वाचा: Mazi Ladki Bahin Yojana List: 1500 रुपये मिळणार की नाही? असं तपासा यादीत तुमचं नाव!

 

अधिक माहितीसाठी मुंबई विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाइट https://mu.ac.in/ वरून माहिती मिळवू शकता.

अर्जासाठीची लिंक

https://muappointment.mu.ac.in/

हेही वाचा: Vidhan Sabha Election : महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार? जरांगेंचा पहिल्यांदाच मोठा दावा

 

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1JM3P8Q9jeFZEVVPn6FuPFzne7FDoohKn/view?usp=sharing

    follow whatsapp