Monsoon 2021 : महाराष्ट्रासाठी पुढचे ५ दिवस धोक्याचे, IMD कडून अलर्ट जाहीर

मुंबई तक

• 06:16 AM • 09 Jun 2021

कोकण किनारपट्टीवर दाखल झालेल्या मान्सूनने आज मुंबईत धडक दिली. मुंबई शहरात काल रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने मुंबईसह महाराष्ट्रासाठी पुढचे ५ दिवस धोक्याचे असल्याचं सांगत अलर्ट जाहीर केला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे. Regional Meteorological Centre, Mumbai issues weather warning for the next […]

Mumbaitak
follow google news

कोकण किनारपट्टीवर दाखल झालेल्या मान्सूनने आज मुंबईत धडक दिली. मुंबई शहरात काल रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने मुंबईसह महाराष्ट्रासाठी पुढचे ५ दिवस धोक्याचे असल्याचं सांगत अलर्ट जाहीर केला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे.

हे वाचलं का?

मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक अहमदनगर या जिल्ह्यांना पुढील ५ दिवस सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पहिल्या दोन दिवसांमध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. १२ जूनपर्यंत पावसाचा जोर राज्यात कायम राहणार आहे. बंगालच्या उपसागरा निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात हा पाऊस पडत आहे.

मुंबईत आज दिवसभर वातावरण ढगाळ राहणार असून शहर आणि उपनगर भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आतापर्यंत मुंबईच्या ई वॉर्डात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. मुंबई शहरात आतापर्यंत ४८.९९ एम.एम. , पूर्व उपनगरात ६६.९९ एम. एम. तर पश्चिम उपनगरात ४८.७८ एम.एम. पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज पहाटेपासूनच आभाळ दाटून आलेलं पहायला मिळालं. सकाळपासून शहरातील अनेक भागांमध्ये गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सून शनिवारी रत्नागिरीच्या हर्णे किनारपट्टी भागात पोहचल्याची हवामान विभागाने दिली आहे. मुंबई महापालिकेनेही हवामान विभागाचा अंदाज लक्षात घेऊन शहरात पावसामुळे पाणी साचणार नाही तसेच कोणताही अपघात होणार नाही याची काळजी घेतली आहे.

दुसरीकडे रायगड जिल्ह्यातही जिल्हाधिकाऱ्यांनी सतर्कतेचे आदेश दिले आहेत. रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, रोहा, म्हसळा, माणगाव, पनवेल, खालापूर, कर्जत, सुधागड, श्रीवर्धन, तळा या तालुक्यांमधील गावांमध्ये दरड कोसळण्याची भीती आहे. दरड क्षेत्रात येणाऱ्या १०३ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान अतिवृष्टीच्या काळात कोणीही समुद्रात जाऊ नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

    follow whatsapp