प्रसिद्ध किर्तनकार ताजोद्दीन महाराज यांचं निधन, किर्तन सुरु असताना हृदयविकाराचा झटका

मुंबई तक

• 10:04 AM • 28 Sep 2021

महाराष्ट्रातले प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. ताजोद्दीन महाराज शेख यांचं यांचं सोमवारी रात्री निधन झालं. धुळे जिल्ह्यातील साक्री येथे जामदे गावात किर्तन सेवा सुरु असताना ताजोद्दीन महाराजांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यावेळीच त्यांनी आपला देह ठेवला. ज्ञानेश्वरीच्या पारायण सप्ताहानिमीत्त या किर्तनाचे आयोजन करण्यात आलं होतं. किर्तनादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ताजोद्दीन महाराज अचानक खाली कोसळले. यावेळी स्थानिक मंडळींनी […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रातले प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. ताजोद्दीन महाराज शेख यांचं यांचं सोमवारी रात्री निधन झालं. धुळे जिल्ह्यातील साक्री येथे जामदे गावात किर्तन सेवा सुरु असताना ताजोद्दीन महाराजांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यावेळीच त्यांनी आपला देह ठेवला. ज्ञानेश्वरीच्या पारायण सप्ताहानिमीत्त या किर्तनाचे आयोजन करण्यात आलं होतं.

हे वाचलं का?

किर्तनादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ताजोद्दीन महाराज अचानक खाली कोसळले. यावेळी स्थानिक मंडळींनी उपचारासाठी त्यांना नंदूरबार येथे नेत असताना वाटेतच त्यांचं निधन झालं. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ताजोद्दीन महाराजांनी आपल्या सांप्रदायीक आणि किर्तन सेवेची सुरुवात औरंगाबाद शहरातून केली. किर्तन, भारुडं, गवळणी, रामायण कथा याचा त्यांचा गाढा अभ्यास होता. संत साहित्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, वीर सावरकर यांच्यावरही ते आपल्या किर्तनातून भाष्य करायचे. आपल्या प्रत्येक किर्तनातून समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे हा त्यांचा प्रयत्न असायचा. ताजुद्दीन बाबा हे घनसावंगी तालुक्यातील बोधलापूर येथे राहत होते.

ताजुद्दिन बाबा हे लहानपणापासुन वैष्णव पंथी होते, दर वर्षी ते आळंदीची वारी करीत असत. हिंदू मुसलमान दोघांतील दरी मिटवण्यासाठी त्यांनी आजवर हजारो कीर्तने केली. त्यांचा जन्म औरंगाबाद जवळील सातारा भागात झाला होता. त्यांनी काही काळ पुणे येथे जाऊन कंपनी मध्ये काम ही केले होते. त्यांना लहानपणापासूनच कीर्तनाची आवड होती. त्यांच्या या आवडीमुळे त्यांना आणि कुटुंबाला त्रास ही सहन करावा लागला होता. परंतू ताजुद्दीन बाबांनी कधीही किर्तनसेवा करायचं थांबवलं नाही.

दोन वर्षांपूर्वी साक्री तालुक्यातच एका किर्तनादरम्यान ताजोद्दीन महाराजांनी किर्तन करताना मला मरण आलं तर माझ्यासारखा भाग्यवान मीच असेन असं वक्तव्य केलं होतं, आणि दोन वर्षांनी हा योगायोग महाराजांच्या आयुष्यात घडून आला. मुस्लीम धर्मात जन्म झाला असला तरीही महाराजांनी कधीही कट्टरतावादी विचारांना न जुमानता आपली किर्तनसेवा सुरु ठेवली. ताजुद्दीन महाराजांच्या निधनामुळे वारकरी संप्रदायातून शोक व्यक्त केला जात आहे.

    follow whatsapp