पुण्यात निवृत्त कर्नलने गोळी झाडून केली पत्नीची हत्या, स्वत:लाही संपवलं

मुंबई तक

• 03:40 AM • 21 Apr 2022

पुणे: पुण्यातील मुंढवा परिसरात राहणार्‍या सेवानिवृत्त कर्नलने पत्नीची डबल बोअरच्या बंदुकीतून 2 गोळ्या झाडून हत्या करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या हत्येनंतर कर्नलने स्वतःवर देखील 2 गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. निवृत्त कर्नल नारायण सिंग बोरा (वय 75 वर्ष) आणि चंपा नारायण सिंग बोरा (वय 63 वर्ष) […]

Mumbaitak
follow google news

पुणे: पुण्यातील मुंढवा परिसरात राहणार्‍या सेवानिवृत्त कर्नलने पत्नीची डबल बोअरच्या बंदुकीतून 2 गोळ्या झाडून हत्या करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या हत्येनंतर कर्नलने स्वतःवर देखील 2 गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. निवृत्त कर्नल नारायण सिंग बोरा (वय 75 वर्ष) आणि चंपा नारायण सिंग बोरा (वय 63 वर्ष) अशी मयत दोघांची नावे आहे.

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत निवृत्त कर्नल नारायण सिंग बोरा यांना तीन मुले आहेत. त्यापैकी एक मुलगा वडिलांना सकाळपासून फोन करीत होता. पण काही प्रतिसाद मिळत नव्हता.

तेव्हा मुलाने त्याच्या मित्राला फोन करून घरी जाऊन पाहण्यास सांगितले. तरी देखील कोणत्याही प्रकाराचा आतून प्रतिसाद येत नव्हता. त्यानंतर दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केल्यावर निवृत्त कर्नल नारायण सिंग बोरा आणि त्यांची पत्नी चंपा नारायण सिंग बोरा यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. तर मृतदेहच्या बाजूला बंदूक देखील होती.

त्यामुळे यातून सुरुवातीला पतीने पत्नीचा खून केला आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तसेच या घटनेमागील नेमकं कारण अद्यापपर्यंत समजू शकले नसल्याचे मुंढवा पोलिसांनी सांगितले आहे. तसेच या प्रकरणी अधिक तपास करण्यात येत आहे.

वयोवृद्ध दाम्पत्यांचा अशा प्रकारे अंत झाल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. मात्र, असं असलं तरीही पोलीस आता याप्रकरणी सर्वच बाजूने सध्या तपास करत आहे. त्यामुळे तपासाअंती या घटनेमागचं नेमकं कारण काय आहे हे समोर येणार आहे.

चारित्र्याच्या संशयावरून 59 वर्षीय पतीने केली 51 वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एका 59 वर्षीय पतीने आपल्या 51 वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना जुन्नर तालुक्यातील वडगाव येथे घडली होती. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, संध्या सुरेश शिंदे (वय 51 वर्ष) या महिलेची त्यांचे पती सुरेश दगडू शिंदे (वय 59 वर्ष) यांनी 1 जानेवारी रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास गळा आवळून हत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी महिलेचा पती आरोपी सुरेश शिंदे याची सुरुवातीला चौकशी केली. त्यानंतर चौकशीत सुरेश शिंदे सहाय्य करत नसल्याने नारायणगाव पोलिसांनी त्याला अटक केली.

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची मोबाइल चार्जरच्या केबलने हत्या, पतीनेही घेतला गळफास

दरम्यान, पोलिसांनी सुरेश शिंदेला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. आपणच चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची कबुली त्याने दिली. अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

आरोपी सुरेश शिंदे व मयत संध्या शिंदे यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वाद होत होते. चारित्र्यावरुन संशय घेत आरोपी सुरेश शिंदे हा सातत्याने पत्नी संध्या शिंदे हिच्याशी वाद घालायचा.

शनिवारी देखील सुरेश याने रात्री उशिरा आपल्या पत्नीसोबत वाद घातला. मात्र, यावेळी संताप अनावर झाल्यानंतर सुरेशने थेट आपल्या पत्नीची गळा आवळून हत्याच केली.

    follow whatsapp