नव्याने आलेल्या कृषी कायद्यांविरोधात जवळपास दोन महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. शेतकरी आणि सरकार यांच्यात कोणताच तोडगा निघण्याची चिन्हं दिसत नाही. त्याच आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू आहे. अशातच आता जगप्रसिद्ध पॉप सिंगर आणि परफॉर्मर रिहाना नेसुद्धा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय.
ADVERTISEMENT
शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आवाज रिहानापर्यंत पोचलाय. रिहानाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत ट्विट केलंय. यावरूनच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने तिच्यावर टीका केलीय.
रिहानाने ट्विटरवर एक बातमी शेअर केलीय. यात बातमीत शेतकरी आंदोलनामुळे इंटरनेट सेवा बाधित झाल्याचा उल्लेख आहे. तसंच शेतकरी आंदोलनामुळे हरयाणाच्या अनेक जिल्ह्यात इंटरनेट सेवा कशी बंद करण्यात आलीय, याची माहितीही या बातमीत देण्यात आलीय.
याच बातमीवरून रिहानाला भारतातल्या शेतकरी आंदोलनाची माहिती झाली. त्यानंतर तिने हीच बातमी ट्विटरवर शेअर करून लिहिलं, ‘आम्ही याविषयी बोलत का नाही.’ तिने आपल्या ट्विटसोबत #FarmersProtest असा हॅशटॅगही वापरलाय.
रिहाना ही एक जगप्रसिद्ध कलाकार आहे. त्यामुळेच भारतातल्या शेतकरी आंदोलनाबद्दल रिहानाने प्रतिक्रिया देणं ही काही कानाडोळा करण्यासारखी गोष्ट नाही. दुसरीकडे
रिहानाच्या या ट्विटला कंगना रनौतने प्रत्यूत्तर दिलंय.
कंगना लिहिते, ‘याविषयी कुणी बोलत नाही. कारण हे शेतकरी नाहीत, तर दहशतवादी आहेत. जे भारताची फाळणी करू इच्छितात. चीनसारखे देश भारतावर ताबा मिळवू शकतील आणि अमेरिकासारखंच एक चायनीज वसाहत बनवू इच्छितात. मूर्ख, तू गप्प बस्स. आम्ही लोक काही तुमच्यासारखे मूर्ख नाही, जे आपल्या देशाला विकायला लावतील.’
रिहाना नंतर आता पर्यावरण प्रश्न मांडणाऱ्या लहानग्या ग्रेटा थनबर्गनेही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत ट्विट केलंय. ग्रेटा थनबर्ग आपल्या ट्विटमध्ये लिहिते, ‘आम्ही भारतातल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासोबत एकजूटीनं उभं आहोत.’
ADVERTISEMENT