काळ आला होता पण ‘त्या’ने वेळ येऊ दिली नाही, RPF जवानाने वाचवले रेल्वे प्रवाशाचे प्राण

मुंबई तक

• 01:41 PM • 18 Apr 2022

रेल्वेने प्रवास करत असताना धावती गाडी पकडण्याचा प्रयत्न करु नका ही सूचना अनेकदा प्रशासनातर्फे केली जाते. परंतू अनेकदा याकडे दुर्लक्ष करत प्रवासी चालत्या गाडीतून उतरणे, धावती गाडी थांबण्याच्या आधी पकडणे असे प्रकार करत असतात. अनेकदा असं करत असताना प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कल्याण रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर आलेल्या गोदान एक्सप्रेसमध्ये एक प्रवासी […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

रेल्वेने प्रवास करत असताना धावती गाडी पकडण्याचा प्रयत्न करु नका ही सूचना अनेकदा प्रशासनातर्फे केली जाते. परंतू अनेकदा याकडे दुर्लक्ष करत प्रवासी चालत्या गाडीतून उतरणे, धावती गाडी थांबण्याच्या आधी पकडणे असे प्रकार करत असतात. अनेकदा असं करत असताना प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

हे वाचलं का?

कल्याण रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर आलेल्या गोदान एक्सप्रेसमध्ये एक प्रवासी धावती गाडी पकडण्याचा प्रयत्न करत होता. परंतू तोपर्यंत गाडीने वेग पकडल्यामुळे या प्रवाशाला आत शिरता आलं नाही आणि तोल जाऊन तो खाली पडला. यावेळी गाडीच्या वेगामुळे हा प्रवासी गटांगळ्या खात ट्रॅकखाली येत होता.

परंतू इतक्यातच रेल्वे स्टेशनवर तैनात असलेल्या RPF जवानांना ही बाब लक्षात आली आणि त्यांनी या प्रवाशाला पाय धरुन पाठीमागे ओढत त्याचे प्राण वाचवले. दुपारी 12 वाजल्याच्या दरम्यान कल्याण रेल्वे स्थानकात ही घटना घडली. पोलिसांनी या प्रवासाची चौकशी केली असता त्याचं नाव पवन अशोक उपाध्याय असं असून तो उत्तर प्रदेशचा रहिवासी असल्याचं कळतंय.

सुदैवाने या अपघातात पवनला कोणतीही दुखापत झाली नसून किरकोळ जखमा झाल्या आहेत. प्राथमिक उपचार केल्यानंतर या व्यक्तीला सोडून देण्यात आलं आहे. परंतू RPF जवानांनी दाखवलेल्या कर्तव्यदक्षतेचं सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.

    follow whatsapp