आरपीआयचा मंत्री मंडळात सहभाग असणार- आठवले; ‘मनसेला मंत्रीपद मिळणार असेल तर विरोध करु’

मुंबई तक

• 03:52 PM • 10 Jul 2022

राज्यात काही दिवसांपूर्वीच शिंदे गट आणि भाजपाचे सरकार स्थापन झाले असल्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता काही दिवसातच राज्याच्या मंत्री मंडळाचा विस्तार होणार असून या मंत्री मंडळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला देखील १ मंत्री पद मिळेल असे केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास […]

Mumbaitak
follow google news

राज्यात काही दिवसांपूर्वीच शिंदे गट आणि भाजपाचे सरकार स्थापन झाले असल्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता काही दिवसातच राज्याच्या मंत्री मंडळाचा विस्तार होणार असून या मंत्री मंडळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला देखील १ मंत्री पद मिळेल असे केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून सांगण्यात आले. आठवले हे कल्याणात एका कार्यक्रमात आले असताना त्यांच्याकडून ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

हे वाचलं का?

मनसेला देखील मंत्री मंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा आहे असे विचारले असता मनसेला मंत्रिमंडळात घेण्याचा काही संबंधच नाहीये, मनसे हा निवडणुकीत आमच्या सोबत नसल्याने त्यांना मंत्री पद देण्याचा प्रश्नच येत नाही… जर तसा विचार होत असेल तर त्याचा विरोध करू असे मंत्री रामदास आठवले यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मंत्रीमंडळात कोणाची वर्णी लागणार याबाबत सर्वांना उत्सुकता आहे. अशातच रामदास आठवले यांनी ही प्रतिक्रिया दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.

मनसेचे राज्यात एकच आमदार आहेत. राज्यसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत मनसेने भाजपला मदत केली आहे. भाजपच्याबाजूने मतदान केले आहे. त्यामुळे मनसेला मंत्रीपद मिळणार अशी चर्चा आहे. काही दिवसांपुर्वी शिवसेनेचे बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्यामुळे आता मंत्रीपद कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे.

    follow whatsapp