बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता अजय देवगणचा आज वाढदिवस आहे. अजय आज त्याचा 52वा वाढदिवस साजरा करतोय. तर आज वाढदिवसाच्या निमित्ताने दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी अजय देवगणला मोठ गिफ्ट दिलं आहे. अजयच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आगामी आरआरआर सिनेमातील त्याचा लूक रिलीज करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
आरआरआर सिनेमातील अजयचा हा लूक त्याच्या चाहत्यांना फार आवडला आहे. आज सकाळीच याचं मोशन पोस्टर रिलीज केलं गेलं. या पोस्टरमधून या सिनेमातील अजयचा फर्स्ट लूक लोकांसमोर आला आहे. अजयचा हा फर्स्ट लूक पाहून लोकांची उत्सुकता आता फार वाढली आहे.
याशिवाय अभिनेता अजय देवगणनेही त्याच्या सोशल मीडियावरून एक व्हिडीयो शेअर केला आहे. या व्हिडीयोमध्ये अजयची या सिनेमातील एन्ट्री दिसून येतेय. हा व्हिडीयो प्रेक्षकांनाही फार भावला आहे.
#BirthdaySpecial- …म्हणून वाढदिवसाच्या दिवशी अजय केक कापत नाही!
यावर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमामध्ये अजय देवगणसोबत राम चरण आणि आलिया भट्टदेखील दिसणार आहेत. अजय देवगण आणि आलिया भट्टने या सिनेमाच्या माध्यमातून तेलुगु सिनेमांमध्ये एन्ट्री केली आहे. यापूर्वी आलिया भटचा फर्स्ट लूकही तिच्या वाढदिवसाला रिलीज केला होता. आलिया या चित्रपटात सीताची भूमिका साकारणार आहे.
ADVERTISEMENT