‘त्याशिवाय’ NDA पुन्हा सत्तेत येणार नाही, तसा बंदोबस्तच केलाय : महादेव जानकर

मुंबई तक

11 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:25 AM)

पंढरपूर : राष्ट्रीय समाज पक्षाच्या मदतीशिवाय राज्यात आणि केंद्रात पुन्हा भाजपप्रणित NDA चं सरकार सत्तेत येणार नाही, असा मोठा दावा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला. तसंच लोकसभा निवडणुकीत ‘एनडीए’ने उमेदवारी नाकारली तर अन्य पर्यायांचाही जरूर विचार करु असा इशाराही जानकर यांनी यावेळी दिला. राष्ट्रीय समाज पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळाव्यासाठी महादेव जानकर मंगळवारी […]

Mumbaitak
follow google news

पंढरपूर : राष्ट्रीय समाज पक्षाच्या मदतीशिवाय राज्यात आणि केंद्रात पुन्हा भाजपप्रणित NDA चं सरकार सत्तेत येणार नाही, असा मोठा दावा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी केला. तसंच लोकसभा निवडणुकीत ‘एनडीए’ने उमेदवारी नाकारली तर अन्य पर्यायांचाही जरूर विचार करु असा इशाराही जानकर यांनी यावेळी दिला.

हे वाचलं का?

राष्ट्रीय समाज पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळाव्यासाठी महादेव जानकर मंगळवारी पंढरपुरमध्ये आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना जानकर म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्षाला सोबत घेतल्याशिवाय राज्यातील आणि केंद्रात भाजपप्रणित ‘एनडीए’चं सरकार बनणार नाही. २०२४ च्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाने तसा बंदोबस्तच केला आहे.

रासप पक्ष सध्या सर्वत्र पक्ष वाढीसाठी काम करत आहे. आम्ही डिमांड करणारे नव्हे तर कमांड मिळवणारे होत आहोत. त्यामुळे 2024 साली आम्हाला विचारात घेतल्याशिवाय ‘एनडीए’चे सरकार बनणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ. तसंच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामती , परभणी आणि माढा या तीन मतदारसंघावर आपले लक्ष आहे. एनडीएने आपली उमेदवारी नाकारली तर आपण निवडणूक लढणार असल्याचे ही जानकर यांनी सांगितलं.

जानकर पुन्हा बारामतीमधून उतरणार?

भाजपने सध्या मिशन बारामती हाती घेतलं आहे. यासाठी मागील अनेक दिवसांपासून भाजपने इथे ताकद लावायला सुरुवात केली आहे. केंद्रीय मंत्र्यांचे दौरे आयोजित केले जात आहेत. भाजपच्या आमदार राम शिंदे यांना इथे प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे. अशात महादेव जानकर यांनी पुन्हा या मतदार संघात अॅक्टिव्ह होण्याचे संकेत दिले आहेत.

२०१४ साली महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना विजयासाठी संघर्ष करावा लागला होता. ते भाजपच्या तिकिटावर नसल्याचा तोटा त्यांना बसल्याचं सांगितलं गेलं. अशात आथा जानकर यांच्या या जुन्या अनुभवाचा फायदा भाजप घेणार की? जानकर स्वबळावर मिशन बारामती सुरु करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

    follow whatsapp