मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ‘राष्ट्रमंच’ची एक बैठक पार पडली. ज्याबाबत राजकीय वर्तुळात फारच चर्चा रंगली. पण या बैठकीवरुन शिवसेनेने थेट काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनाच डिवचलं आहे.
ADVERTISEMENT
‘काँग्रेसने राष्ट्रमंचला महत्त्व दिले नाही. खरे तर मंगळवारी शरद पवारांनी विरोधी पक्षाचे जे चहापान केले तसे सोहळे दिल्लीतल राहुल गांधी यांनी सुरु केले तर मरगळलेल्या विरोधी पक्षाच्या चेहऱ्यावर तरतरीत भाव दिसू लागतील.’ असं मत शिवसेनेचं (Shiv Sena) मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आलं आहे.
‘काँग्रेस पक्ष स्वत:च गेले कित्येक महिने राष्ट्रीय अध्यक्षांविनाच हालतडुलत आहे. खरे म्हणजे काँग्रेससारखा प्रमुख विरोधी पक्ष या सर्व घडामोडीत बरोबरीने उतरायला हवा. विरोधकांची एकजूट करण्याच्या शरद पवारांच्या या प्रयत्नात राहुल गांधींसारख्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्याने सहभागी व्हायला हवे.’ असा सल्ला देखील शिवसेनेने राहुल गांधींना दिला आहे.
शिवसेनेच्या मते, राहुल गांधी यांनी अधिक सक्रीयपणे राजकारण करुन भाजप आणि मोदी सरकारला जेरीस आणावं. असं अग्रलेखात म्हटलं आहे. जाणून घ्या अग्रलेखात नेमकं काय-काय म्हटलं आहे.
दिल्लीतल्या बैठकीत शरद पवारांनी शिवसेनेबाबत काय म्हटलं? सुधींद्र कुलकर्णींनी दिलं उत्तर
‘सामना’च्या अग्रलेखातील महत्त्वाचे मुद्दे:
-
श्री. शरद पवार यांच्या दिल्लीतील ६ जनपथ या निवासस्थानी राष्ट्रमंच नामक विरोधी पक्ष गटाची एक बैठक झाली. बैठक अडीच तास झाली असे म्हणतात. या बैठकीचा बराच गाजावाजा मीडियाने केला. अर्थात बैठकीआधी हा राष्ट्रमंच जेवढा गाजला तेवढा त्याच्या बैठकीतून काही निष्पन्न झाले नाही. देशात अनेक ज्वलंत प्रश्न आहेत, परंतु ते सोडविण्याचे व्हिजन सरकारकडे नाही. सरकारला ते व्हिजन वैगरे देण्याचे काम राष्ट्रमंच करणार असल्याचे सांगण्यात आले.
-
मुळात राष्ट्रमंच नावाचा एक प्रकार अस्तित्वात आहे व त्याची स्थापना यशवंत सिन्हा यांनी करुन ठेवली आहे, हे या निमित्ताने उघड झाले आहे. श्री. सिन्हा हे घोर मोदीविरोधक आहेत व सध्या त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपातून बाहेर पडल्यावर सिन्हा यांनी राष्ट्रमंच स्थापन केला व त्यात समविचारी लोकांना एकत्र केले.
-
जावेद अख्तर, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, राष्ट्रीय लोकदलाचे जयंत चौधरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे बिनॉय विस्वम, सुधींद्र कुलकर्णी असे काही लोक उपस्थित होते. या बैठकीत राजकीय चर्चेबरोबरच कोरोना संकट, वाढती महागाई, बेरोजगारी अशा प्रश्नावर विचारमंथन झाले. म्हणजे नक्की काय झाले?
Sharad Pawar Meeting: पवारांनी बोलवलेल्या बैठकीला शिवसेनेला का नव्हतं निमंत्रण?, पाहा राऊत काय म्हणाले
-
पवारांच्या ६ ‘जनपथ’वर जे लोक जमले ते राजकीय कृतीपेक्षा विचार मंथनावर भर देणारे होते. पवारांचे घर, पवारांचे चाय-बिस्कुट व आपली काय ती विचारमंथनांची घुसळण असा फक्कडसा बेत दिल्लीत झाला.
-
त्याचा फक्त आस्वाद घेण्याचे काम पवार यांनी केले. कारण नंतरच्या पत्रकार परिषदेत पवार पत्रकार परिषदेत पवार उपस्थित राहिले नाहीत.
-
मोदी किंवा भाजपविरुद्ध आघाडी हे एकमेव ध्येय ठेवूनच विरोधी पक्षांची मोट बांधायची काय? यावरच आधी विचारमंथन होणं गरजेचं आहे.
Sharad Pawar: पवारांच्या मनात नेमकं काय?, प्रशांत किशोर तिसऱ्यांदा शरद पवार यांच्या भेटीला
-
प. बंगालात ममता बॅनर्जी, तामिळनाडूत स्टॅलिन, बिहारात संघर्ष करुन भाजप-नितीश कुमारांना जेरीस आणणारे तेजस्वी यादव, तेलंगणात चंद्रशेखर राव, आंध्रात चंद्राबाबू, जगन मोहन, केरळात डावे आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, शरद पवार व काँग्रेस यांनी एकत्र येऊन ज्य पद्धतीने भाजपला रोखले तेच खरे विरोधी पक्षांचे विचारमंथन आहे.
-
पंतप्रधान मोदी यांची देहबोली आता बदललेली दिसते व देशाची एकंदरीत परिस्थिती बरी नसून आपले नियंत्रण राहिलेले नाही हे त्यांच्या देहबोलीवरून स्पष्ट दिसते.
शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीत काय घडलं? सुधींद्र कुलकर्णी यांनी दिलं उत्तर
-
लोकांत रोष, अप्रीती असली तरी सरकारला आणि भाजपला धोका नाही या आत्मविश्वासाची ठिणगी आजही त्यांच्या मनात आहे ती कमजोर, विस्कळीत पडलेल्या विरोधी पक्षाचा अवतार पाहून. ‘युपीए’ नावाची संघटना आहे, पण देशात प्रबळ, संघटित विरोधी पक्ष आहे काय? हा प्रश्न लटकूनच पडला आहे.
-
पवारांच्या घरी ‘राष्ट्रमंच’चे चहापान झाले. त्यानिमित्ताने विरोधी पक्ष नक्की कोठे आहे? या प्रश्नाला वाचा फुटली इतकेच. निदान त्यासाठी तरी ‘राष्ट्रमंच’वाल्यांचे आभार मानायला हरकत नाही.
-
काँग्रेसने राष्ट्रमंचला महत्त्व दिले नाही. खरे तर मंगळवारी शरद पवारांनी विरोधी पक्षाचे जे चहापान केले तसे सोहळे दिल्लीतल राहुल गांधी यांनी कसुरु केले तर मरगळलेल्या विरोधी पक्षाच्या चेहऱ्यावर तरतरीत भाव दिसू लागतील. पंतप्रधान मोदी व त्यांच्या सरकारची लोकप्रियता पूर्वीची राहिलेली नाही. ती घसरलेली आहे. पण त्या घसरलेल्या जागेवर सध्याचा विरोधी पक्ष वाढतोय, रुजतोय असे दिसत नाही. काही
-
राज्यांतील निवडणुकांत विरोधी पक्षांचा विजय झाला. ती विजयाची सळसळही आता थंड झाली. दिल्लीत ठाण मांडून बसेल व देशातील समस्त विरोधी पक्षांशी समन्वय घडवेल, अशी व्यवस्था इतक्या दिवसांत घडू शकलेली नाही. शरद पवार हे सर्व घडवू शकतात, पण पुन्हा नेतृत्वाचा प्रश्न उपस्थित केला जातो.
-
काँग्रेसने याकामी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा ठेवली तर काँग्रेस पक्ष स्वत:च गेले कित्येक महिने राष्ट्रीय अध्यक्षांविनाच हालतडुलत आहे. खरे म्हणजे काँग्रेससारखा प्रमुख विरोधी पक्ष या सर्व घडामोडीत बरोबरीने उतरायला हवा. विरोधकांची एकजूट करण्याच्या शरद पवारांच्या या प्रयत्नात राहुल गांधींसारख्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्याने सहभागी व्हायला हवे.
ADVERTISEMENT