पेण: साहित्य अकादमी विजेते सुप्रसिद्ध कवी सतीश काळसेकर यांचं वयाच्या 78 व्या वर्षी निधन झालं आहे. शुक्रवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. रायगड जिल्ह्यातील पेणमधील आपल्या राहत्या घरी त्यांचं निधन झाल्याचं समजतं आहे. काळसेकर यांच्यासारख्या प्रतिभावान कवी आणि लेखकाच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. नवोदित लेखक आणि कवींना कायम प्रेमाने मार्गदर्शक करणारे सतीश काळसेकर यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
ADVERTISEMENT
सतीश काळसेकर हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्यातील आहेत. काळसे गावी त्यांचा जन्म झाला आणि इथंच त्यांचं शालेय शिक्षण देखील पूर्ण झालं. सिंधुदुर्गात शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबईत येऊन आपलं पुढील शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी सुरुवातीला टाइम्स ऑफ इंडियामध्ये काही काळ काम केलं. पण काही वर्षातच त्यांना बँक ऑफ बडोदामध्ये नोकरी लागली. इथे त्यांनी 2001 सालापर्यंत नोकरी केली. पण आपल्या बँकेची नोकरी सांभाळत त्यांनी साहित्य क्षेत्रातील आपली मुशाफिरी सुरुच ठेवली.
सुरुवातीच्या काळात त्यांच्या काही कविता या नियतकालिका आणि वृत्तपत्रांमद्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यानंतर 1971 साली त्यांचा पहिला कविता संग्रह इंद्रियोपनिषद् प्रकाशित करण्यात आला होता. त्यांच्या याच कविता संग्रहामुळे साहित्य विश्वात त्यांना नवी ओळख मिळाली होती. इथून सुरु झालेला त्यांचा प्रवास हा शेवटपर्यंत सुरुच होता. दरम्यान, 2014 साली त्यांच्या ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ या पुस्तकाला मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.
सतीश काळसेकर यांचे इंद्रियोपनिषद्, साक्षात आणि विलंबित हे कविता संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. तर त्यांनी लेनिनसाठी हे लेनिनवरच्या कवितांचे अनुवाद देखील त्यांनी केलं आहे.
याशिवाय वाचणार्याची रोजनिशी हे त्यांचं पुस्तक 2010 साली प्रसिद्ध झालं होतं. याच पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार देखील मिळाला. यासह त्यांनी इतर प्रकारात देखील विपुल लेखन केलं आहे.
Surekha Sikri Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचं निधन
दरम्यान, त्यांच्या अनेक कवितांचे हिंदी, बंगाली, इंग्रजी, पंजाबी, मल्याळम, यासह विविध भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.
ADVERTISEMENT