Sakinaka Rape Case : आरोपीला कठोर शिक्षा होणार, पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंची ग्वाही

मुंबई तक

• 10:06 AM • 11 Sep 2021

मुंबईतल्या साकीनाका भागात एका महिलेवर बलात्कार झाला. त्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्यात आला तिला मारहाणही करण्यात आली. 9 सप्टेंबरच्या रात्री उशिरा ही घटना साकीनाका भागात घडली. या घटनेने मुंबई हादरली आहे. या बलात्कार पीडित महिलेला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज तिचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. […]

Mumbaitak
follow google news

मुंबईतल्या साकीनाका भागात एका महिलेवर बलात्कार झाला. त्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्यात आला तिला मारहाणही करण्यात आली. 9 सप्टेंबरच्या रात्री उशिरा ही घटना साकीनाका भागात घडली. या घटनेने मुंबई हादरली आहे. या बलात्कार पीडित महिलेला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज तिचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणासंदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेतली.

हे वाचलं का?

हेमंत नगराळे यांनी काय म्हटलं आहे?

9 आणि 10 च्या रात्री साधारण तीन वाजण्याच्या सुमारास साकीनाका या ठिकाणी खैरानी रोडवर एक पुठ्ठ्याची कंपनी आहे, तिथल्या वॉचमनने कंट्रोल रूमला फोन करून एका महिलेला रस्त्यावर मारहाण होत असल्याची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रूमने पोलीस अधिकाऱ्यांना पाठवलं. दहा मिनिटांच्या आत पोलीस पोहचले. त्यांना एका उघड्या टेम्पोच्या आतमधे ही महिला अत्यंत भयंकर अवस्थेत आढळली. पोलिसांनी वेळ न दवडता या टेम्पोची चावी घेतली आणि महिलेला राजावडी रूग्णालयात दाखल केलं. या महिलेवर तातडीने उपचार केले. चौकीदाराच्या तक्रारीवरून साकिनाका पोलीस ठाण्यात कलम 307 आणि 376 अन्वये गुन्हा दाखल केला. ज्यानंतर प्रकरणाचा तपास सुरू झाला.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं त्यावरून मोहन नावाच्या एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. या आरोपीचे कपडे जप्त करण्यात आले आहेत. त्यावर काही रक्ताचे डाग होते. पुढील तपासात हे डाग त्या महिलेच्या रक्ताचे आहेत का ते स्पष्ट होईल. मोहनला अटक करण्यात आली. मोहनला 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ACP ज्योत्स्ना रासन या या प्रकरणाच्या तपास अधिकारी असतील. महिनाभराच्या आत हा तपास पूर्ण करण्यात येईल.

दुर्दैवाने उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या गुन्ह्याला 302 चं कलमही लावण्यात आलं आहे. या घटनेत एकापेक्षा जास्त आरोपी आहेत असं सुरूवातीला वाटलं होतं. मात्र या घटनेत एकच पुरूष होता हे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झालं आहे.

    follow whatsapp