ADVERTISEMENT
दाक्षिणात्य सिनेसृष्टीत लोकप्रिय कपल ठरलेल्या अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्याने काही महिन्यांपूर्वीच वेगळं होण्याची घोषणा केली होती.
समांथाने सोशल मीडियावर पोस्ट करून घटस्फोट घेत असल्याची माहिती चाहत्यांना दिली.
समांथाने एक पोस्ट शेअर केली होती. पण, आता याच पोस्टवरून नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
समांथाने घटस्फोटाची घोषणा करणारी पोस्ट इन्स्टाग्रामवरून डिलीट केली आहे.
समांथाच्या अकांऊटवरून ही पोस्ट डिलीट केली गेली की अर्काइव्हजमध्ये टाकण्यात आली, हे स्पष्ट झालेलं नाही.
समांथाच्या इन्स्टावरून घटस्फोटाची पोस्ट हटवण्यात आल्यानंतर दोघे पुन्हा एकत्र तर येत नाहीये ना?, अशी चर्चा सुरू झाली आहे.
दुसरीकडे नागा चैतन्याच्या अकाऊंट घटस्फोटाची पोस्ट अजूनही दिसत आहे. त्यामुळे समांथाने पोस्ट का डिलीट केली, याबद्दल चाहत्यांकडून तर्कविर्तक लावले जात आहेत.
समांथा आणि नागा चैतन्याच्या घटस्फोटापूर्वी अनेक महिन्यांपासून दोघं वेगळं होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
दोघांनीही बराच काळ यावर मौन बाळगलं होतं. मात्र, २ ऑक्टोबर २०२१ रोजी दोघांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती.
आम्ही दोघं विभक्त होत असल्याची घोषणा दोघांनी केली होती. यामुळे त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता.
ADVERTISEMENT