समीर वानखेडेंवर प्रचंड खळबळजनक आरोप करण्यात आलेलं ‘ते’ पत्र जसंच्या तसं…

मुंबई तक

• 08:27 AM • 26 Oct 2021

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात एका निनावी पत्रातून अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे पत्र एका एनसीबी कर्मचाऱ्याने लिहलं असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. हे संपूर्ण पत्र त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर देखील शेअर केलं आहे. पाहा त्या पत्रात नेमकं काय म्हटलंय. समीर वानखेडेंवर गंभीर […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबईचे झोनल अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात एका निनावी पत्रातून अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे पत्र एका एनसीबी कर्मचाऱ्याने लिहलं असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. हे संपूर्ण पत्र त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर देखील शेअर केलं आहे. पाहा त्या पत्रात नेमकं काय म्हटलंय.

हे वाचलं का?

समीर वानखेडेंवर गंभीर आरोप करणारं ‘ते’ पत्र जसच्या तसं..

‘मी एनसीबीचा एक कर्मचारी आहे. मागील दोन वर्षापासून मुंबई कार्यालयात कार्यरत आहे. मागील वर्षी एनसीबीला सुशांत सिंह राजपूत प्रकरणी ड्रग अँगलची चौकशी सोपविण्यात आली आणि माजी महासंचालक श्री. राकेश अस्थाना यांनी एसआयटीचं गठन करुन आपले चेले कमल प्रीत सिंह मल्होत्रा यांना एसआयटीचं प्रभारी बनवून मुंबईमध्ये ड्रग अँगलची चौकशी सोपवली आणि सोबत समीर वानखेडे जे (DRI) मुंबईमध्ये काम करत होते त्यांना गृहमंत्री अमित शाह यांना सांगून नियमबाह्य पद्धतीने डीआरआयने लोन बेसिसवर एनसीबी मुंबईमध्ये झोनल डायरेक्टर पदावर नियुक्त केलं.’

‘राकेश अस्थाना जे सर्वांनाच माहिती आहेत की, ते किती इमानदार अधिकारी आहेत, त्यांनी समीर वानखेडे आणि केपीएस मल्होत्रा यांना साम, दाम, दंड आणि इतर कोणत्याही मार्गाने बॉलिवूडच्या कलाकारांना ड्रग प्रकरणा अडकवून त्यांच्याविरोधात केस तयार करण्याचे आदेश दिले. केस दाखल केल्यानंतर केपीएस मल्होत्रा आणि समीर वानखेडे यांनी या कलाकारांकडून कोट्यवधी रुपयांची मागणी केली आणि कोट्यवधी रुपये उकळून राकेश अस्थाना यांना देखील त्यातील काही हिस्सा दिला.’

बॉलिवूडच्या या कलाकारांकडून (दीपिका पदुकोण, करिश्मा प्रकार, श्रद्धा कपूर, रकूल प्रीत सिंह, सारा अली खान, भारती सिंह, हर्ष लिम्बाचिया, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती आणि अर्जुन रामपाल) सगळे पैसे त्यांचे वकील अयाज खान यांनी गोळा करुन दिले.

अयाज खान यांची मैत्री समीर वानखेडेंशी आहे. ते एनसीबी कार्यालयात कधीही येऊ-जाऊ शकतात. त्यांना कोणीही अडवू शकत नाही. ते समीर वानखेडेला बॉलिवूडकडून दर महिन्याला वसूली करुन देतो. तसंच जेव्हा समीर वानखेडे एखाद्या बॉलिवूड कलाकाराला पकडतो तेव्हा तो त्यांना अयाज खान याला आपला वकील म्हणून नेमण्यास सांगतो.

समीर वानखेडे हे एक अटेन्शन सीकर अधिकारी आहेत. त्यांना नेहमी मीडियामध्ये आपल्या बातम्या हव्या असतात. ज्यासाठी त्यांना अनेक निर्दोष लोकांना खोट्या NDPS केसेसमध्ये अडकवलं आहे. खोट्या केसेस बनविण्यासाठी समीरने आपली एक वेगळी टीम बनवली आहे

ज्यामध्ये सुप्रिटेंडंट विश्व विजय सिंह, आयओ आशिष रंजन, किरण बाबू, विश्वनाथ तिवारी. जिआयओ सुधाकर शिंदे, ओटीसी कदम, शिपाई रेड्डी, पी. डी. मोरे आणि विष्णू मीना, यूडीसी सूरज, ड्रायव्हर विजय, अनिल माने आणि समीरचे खासगी सचिव शरद कुमार यांचा समावेश आहे.

OTC कदम, शिपाई रेड्डी, पी. डी. मोरे आणि विष्णू मीना, ड्रायव्हर अनिल माने हे सर्व जण कोणत्याही घरात ड्रग्स ठेवायचे आणि मग त्यांच्याविरोधात खोट्या केसेस तयार करायचे. काही ठिकाणी हे ड्रग्सचं प्रमाण वाढवून त्यांना कमर्शियल कॉन्टेटी असल्याचे देखील दाखवायचे. जेणेकरुन संबंधित व्यक्तीला जामीन मिळू नये.

याशिवाय आशिष रंजन, किरण बाबू, विश्वनाथ तिवारी आणि सुधाकर शिंदे हे नकली पंचनामे तयार करतात. हे पंचनामे एनसीबी कार्यालयात लिहले जातात. वानखेडे हा आपल्या काही खास लोकांच्या मदतीने ड्रग्स खरेदी करुन नंतर खोट्या केसेस बनवायचा.

त्याच्या या खास माणसांचं नाव दशरथ, जमील, अफजल, मोहम्मद, शेख, नासिर, आदिल उस्मानी अशी आहेत. जे केवळ समीरलाच ड्रग्स पुरवतात. जे खरेदी करण्यासाठी समीर सीक्रेट सर्विस फंड आणि लोकांच्या घरी तपासणीदरम्यान लुटलेल्या पैशांचा वापर करतो.

इथे मी आपल्याला काही केसेसबाबत माहिती देतो ज्यामध्ये समीर आणि त्याची टीम कशाप्रकारे लोकांच्या घरावर धाडी मारुन छाप्यादरम्यान, ड्रग्स ठेवून खोट्या केसेस तयार करतात

1. केस नंबर 16/2020 मध्ये सुरुवातीला करण अरोडा, जैद विलत्रा आणि अबास लखानी यांना पकडलं होतं. ज्यांच्याकडे कमी प्रमाणात गांजा सापडला होता. त्यावेळी समीर वानखेडेने नुकतंच एनसीबी मुंबई जॉईन केलं होतं. त्यावेळी दिनेश चव्हाण सुप्रिटेंडंट ऑपरेशनचा कार्यभार सांभाळत होते आणि विश्व विजय सिंह सुप्रिटेंडंट अॅडिमिनिस्ट्रेशनचा कार्यभार सांभाळत होते. समीर वानखेडेने दिनेश चव्हाणला करण अरोडा, जैद विलत्रा आणि अबास लखानी यांच्या कबुली जबाबत रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा यांची नावं लिहण्यास सांगितली. पण दिनेश चव्हाण यांनी तसं करण्यास साफ नकार दिला.

तेव्हा समीरने दिनेश चव्हाण यांना ऑपरेशनमधून हटवलं आणि विश्व विजय सिंहकडे ती जबाबदारी दिली. तेव्हापासून विश्व विजय सिंह हा समीर वानखेडेच्या हातातलं बाहुलं बनला आहे. त्या दोघांनी मिळून एनडीपीएस कलम 27 A चा खूप दुरुपयोग केला आहे. त्यांनी निर्दोष लोकांना अडकवलं. जसं समीर सांगतो तसंच विश्व विजय सिंह करतो.

या बदल्यात समीर वानखेडे हा विश्व विजय सिंह विरुद्ध एनसीबीमध्ये येणाऱ्या तक्रारी (जे लोकांच्या घरात छाप्यावेळी लाखो रुपये आणि दागिन्यांची लूट होते) खोट्या असल्याचं सांगून त्याला सतत वाचवतो. केस नंबर 16/2020 मध्ये विश्व विजय सिंहने मोहम्मद जुम्मनकडून 20 ते 25 लाख रुपये घेतले. याबाबत एनसीबी ऑफिस मुंबईत लेखी तक्रार देखील करण्यात आली होती. परंतु समीर वानखेडेने हे आरोप चुकीचे असल्याचे म्हणत हे प्रकरण बंद करुन टाकलं.

2. केस नंबर 03/2021 मध्ये समीर खानला खोट्या केमध्ये अटक करुन 200 किलो तंबाखू गांजा असल्याचं दाखवत चुकीच्या पद्धतीने केस तयार केली. तसेच आर्थिक देवाणाघेवाणीचा आरोप लावून एनडीपीएसच्या कलम 27 A चा दुरुपयोग केला.

3. केस नंबर 06/2021 मध्ये मोहम्मद नजीम खानच्या घरी आशिष रंजन आयओने 61 ग्राम प्लांट करुन त्याच्याविरोधात खोटी केस तयार केली आणि त्यालाही तुरुंगात टाकलं.

4. केस नंबर 09/2021 मध्ये मोहम्मद बिलाल याच्याकडे 136 ग्राम मेफड्रोन (MD)ठेवून त्याच्याविरुद्ध खोटी केस तयार केली आणि त्यालाही तुरुंगात टाकलं.

5. केस नंबर 18/2021 मध्ये अमजद असलं शेखच्य घरी आशिष रंजन आयओने 64 ग्राम मेफड्रोन (MD)ठेवून त्याच्याविरुद्ध खोटी केस तयार केली.

6. केस नंबर 24/2021 मध्ये शाहबाद बटलाच्या घरी शिपाई पी डी मोरेने समीरच्या सांगण्यावरुन ड्रग सप्लायर आदिल उसमानीकडून 60 ग्राम मेफड्रोन (MD)खरेदी करुन ते त्याच्या घरी ठेवलं आणि त्याच्याविरोधात खोटी केस तयार केली.

7. केस नंबर 27/2021 मध्ये अब्दुल काबीर आणि नजीया शेख यांच्या घरी 52 आणि 54 ग्राम मेफड्रोन (MD)ठेवून त्यांना अटक केली.

8. केस नंबर 28/2021 मध्ये इमरानच्या घरी आशिष रंजनने 57 ग्राम मेफड्रोन (MD)ठेवून त्याच्याविरोधात खोटी केस तयार केली.

9. केस नंबर 29/2021 मध्ये केन्निथच्या घरी 200 ग्राम मेफड्रोन (MD)ठेवून त्याला अटक केली.

10. केस नंबर 30/2021 मध्ये अन्सारी समीरुद्दीनच्या घरी 55 ग्राम मेफड्रोन (MD)ठेवून त्यालाही तुरुंगात टाकलं.

11. केस नंबर 31/2021 मध्ये चीकुडी पीटर, नायजेरिअन व्यक्तीकडे 22 ग्राम कोकेन आणि 260 ग्राम चरस ठेवून त्याला अटक केली होती.

12. केस नंबर 32/2021 मध्ये अब्दुल गफ्फार कुरेशीच्या घरी 52 ग्राम मेफड्रोन (MD)ठेवून त्याच्याविरोधात खोटी केस तयार केली.

13. केस नंबर 33/2021 मध्ये शोयन हैदर खानच्या घरी घरी 1.2 ग्राम मेफड्रोन (MD) आणि 17 blots LSD ठेवून त्याच्याविरोधात खोटी केस तयार केली. यावेळी शोयनच्या घरी 17 लाख रुपये रोकड मिळाले होते. त्यावेळी एनसीबीच्या टीमने समीरच्या सांगण्यावरुन 9 लाख रुपये एवढीच रोकड दाखवली आणि त्यानंतर त्यांनी उरलेले पैसे वाटून घेतले.

14. केस नंबर 40/2021 मध्ये समील सना आणि सर्फराश कुरशी यांच्या घरी आशिष रंजन आणि विश्व विजय सिंह यांनी 50 आणि 60 ग्राम मेफड्रोन (MD)ठेवून त्यांना अटक केली होती. यावेळी त्यांच्या घरातून 25 लाख रुपये आणि सोन्याचे दागिने गायब करण्यात आले होते. याप्रकरणी तक्रार झाल्यानंतर देखील समीरने ते दाबून टाकलं.

15. केस नंबर 44/2021 मध्ये सिंकदर हुसैन सजादच्या जवळच्या घरातून कोडीन या खोकल्याच्या औषधाच्या 12 बाटल्या, काही प्रमाणात गांजा आणि मेफड्रोन (MD)सापडला होता. पण शिपाई विष्णू मीनाने समीर वानखेडेच्या सांगण्यावरुन 2 कार्टन कोडीन घरात ठेवून त्याच्याविरोधात खोटी केस बनवली. त्याच्या बहिणीकडे विष्णू मीनाच्या हातात 2 कार्टन घेऊन जात असल्याचा व्हीडिओ देखील आहे. पण तिचं कोणीही ऐकत नाहीए.

16. केस नंबर 49/2021 मध्ये अहसान सजाद खानच्या घरी 62 ग्राम मेफड्रोन (MD)ठेवून त्याच्याविरोधात खोटी केस तयार केली.

17. केस नंबर 51/2021 मध्ये सोहेल शेखच्या घरी 62 ग्राम मेफड्रोन (MD)ठेवून त्याला अटक करण्यात आली आहे.

18. केस नंबर 60/2021 मध्ये फाहद सलीम कुरेशी घरी 52 ग्राम मेफड्रोन (MD)ठेवून त्याच्याविरोधात खोटी केस तयार केली.

19. केस नंबर 63/2021 मध्ये मोहम्मद अशील शेखच्या घरी 57 ग्राम मेफड्रोन (MD)ठेवून त्याला अटक करण्यात आली.

20. केस नंबर 71/2021 मध्ये समीर मुख्तार सायदच्या घरी 200 ग्राम चरस मिळालं होतं. पण समीर वानखेडेच्या सांगण्यावरुन त्याच्याविरोधात 1200 ग्राम चरसची खोटी केस तयार केली.

21. केस नंबर 77/2021 मध्ये नायजेरियन नागरिकाला मानखुर्दकडून पकडण्यात आलं. ज्याच्याकडे कोणतंही ड्रग्स सापडलं नव्हतं. पण समीर वानखेडेने त्याच्याकडे 254 ग्राम हेरॉइन आणि 7.5 ग्राम कोकोन ठेवून त्याच्याविरोधात कारवाई केली.

22. केस नंबर 8O/2021 मध्ये एक नायजेरिअन नागरिकाला खारघरमधून पकडलं होतं. ज्याच्याकडे ड्रग्स सापडलं नव्हतं पण समीर वानखेडेने त्याच्याकडे 60 ग्राम मेफड्रोन (MD)मिळाल्याची खोटी केस तयार केली.

23. केस नंबर 88/2021 मध्ये एका आरोपीला पकडण्यात आलं होतं. ज्याला तुरुंगात टाकलं होतं. जप्ती दरम्यान त्याचं डेबिट कार्ड देखील जप्त करण्यात आलं होतं. जे गुजरातमधील एका बँकेचं होतं. त्यावेळी त्याचा पीन नंबर एनबीसी अधिकाऱ्याने घेतला होता आणि समीरच्या सांगण्यानुसार, आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या डेबिट कार्डमधून 40 हजार काढण्यात आले.

24. केस नंबर 94/2021 मध्ये cordelia क्रूझचं जे प्रकरण आहे त्यातील सर्व पंचनामे हे NCB मुंबईच्या ऑफिसमध्ये करण्यात आले. भाजपच्या इशाऱ्यावर त्यांचे दोन कार्यकर्ते हे समीर वानखेडेच्यासोबत मिळून ड्रग्स प्लाँट केले. क्रूझवर एनसीबीचे अधिकारी विश्व विजय सिंह, आशिष रंजन, किरण बाबू, विश्वनाथ तिवारी आणि सुधाकर शिंदे, शिपाई रेड्डी, पीडी मोरे आणि विष्णू मीना, ड्रायव्हर अनिल माने आणि समीर यांचा खासगी सचिव शरद कुमार आणि इतर कर्मचारी आपल्या सामानात लपवून ड्रग्स घेऊन गेले होते.

वेळ साधून त्यांनी काही जणांच्या सामानात ड्रग्स ठेवले. समीर वानखेडेला सर्चमध्ये बॉलिवूड किंवा सेलिब्रिटी सापडला तर तो त्याच्याकडे जबरदस्तीने ड्रग्स ठेवून त्याच्याविरोधात केस तयार करतो. या प्रकरणात देखील हेच झालं आहे.

समीर मागील एक महिन्यापासून भाजपचे दोन कार्यकर्ते केपी गोसावी आणि मनीष भानुशाली यांच्या संपर्कात आहे. दरम्यान, रिशब सचदेव, प्रतीक गाबा आणि अमीर फर्निचरवाल यांना त्याच रात्री सोडून देण्यात आलं होतं. त्यासाठी त्यांना दिल्लीहून फोन आला होता.

अरबाज मर्चंटचा मित्र अब्दुलकडून काही ड्रग्स मिळाले नव्हते. पण समीरच्या सांगण्यावरुन त्याच्याकडे देखील ड्रग्स मिळाले असं दाखवण्यात आलं. समीरने या केसमध्ये एनसीबी कार्यालयाचा ड्रायव्हर विजय याला देखील पंच बनवण्यात आलं होतं. कायद्यानुसार पंच हे स्वतंत्र असले पाहिजे. हे संपूर्ण प्रकरण खोटं आहे.

25. एनसीबने गोव्यामधील प्रसाद वादकेच्या घरी 17 ग्राम LSD शिपाई रेड्डीने ड्रग्स ठेवून त्याच्याविरोधात कारवाई केली.

26. बिग बॉसमध्ये भाग घेणारा अरमान कोहली याच्या घरी शिपाई विष्णू मीना आणि रेड्डी 1 ग्राम कोकोन ठेवून त्याच्याविरोधात खोटी केस तयार करण्यात आली.

जेव्हापासून समीर वानखेडेने एनसीबीचा कार्यभार हाती घेतला आहे तेव्हापासून जेवढ्या काही केसेस समोर आल्या आहेत त्यातील अनेक प्रकरणांमध्ये कोऱ्या कागदावर लोकांकडून सह्या घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे ते लोकं आपल्या मनाप्रमाणे पंचनाम्यात बदल करुन घेतात. सह्या केलेले कोरे कागद हे एनसीबीच्या आयओएसच्या टेबलाजवळच आहेत.

आपण विश्व विजय सिंहच्या कार्यालयातील खोली छापा मारुन मिळवू शकतात. यासोबतच काही प्रमाणात ड्रग्स समीर आणि विश्व विजय सिंह यांच्या केबिनमधून देखील आपल्याला मिळू शकतं. श्री. अशोक मुथा जैन, DDG (SWR) यांना समीर वानखेडे दर महिन्याला एक मोठी रक्कम लाच म्हणून देतो. ज्यामुळे समीरच्या चुकीच्या कामांकडे ते दुर्लक्ष करतात.

समीर व अन्य अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार झाली तरीही ते दुर्लक्ष करतात. जे अधिकारी समीरच्या चुकीच्या कामांमध्ये साथ देत नाहीत त्यांना तो कोणत्या ना कोणत्या प्रकारे निलंबित करतात. आतापर्यंत समीरने चार इमानदार अधिकाऱ्यांना निलंबित केलं आहे.

‘वानखेडे लोकांच्या घरात ड्रग्स प्लांट करतो’, NCB अधिकाऱ्याचं खळबळजनक निनावी पत्र

मी आपल्याला विनंती करतो की, या सर्व केसेसची पुन्हा चौकशी केली जावी. या केसेसमध्ये पकडण्यात आलेल्या लोकांची देखील चौकशी केली जावी. त्यानंतर आपल्याला सत्य समजेल. यावरुन आपल्याला समजेल की, समीर वानखेडेने सगळ्या खोट्या केसेस तयार करतो.

महाराष्ट्र सरकारकडे देखील विनंती आहे की, एक चौकशी समिती बनवून या प्रकरणाची चौकशी केल्यास सत्य समोर येईल. मी माझं नाव सांगू शकत नाही कारण की, मी देखील सध्या NCB चा भाग आहे आणि मला देखील नुकसान पोहचवलं जाईल.

धन्यवाद, जय हिंद… भारत माता की जय!

NCB च्या बेइमानीविरोधात एक सच्चा देशभक्त

    follow whatsapp