तामिळनाडूमध्ये मोठी राजकीय घडामोड, शशिकला यांचा राजकीय संन्यास

मुंबई तक

• 04:54 PM • 03 Mar 2021

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. अशात AIADMK मधून निलंबित करण्यात आलेल्या आणि दिवंगत जयललिता यांच्या अत्यंत जवळच्या सहकारी शशिकला यांनी मोठी घोषणा केली आहे. शशिकला यांनी राजकीय आयुष्यातून संन्यास घेतला आहे. मी आजवर कोणत्याही पदाच्या लालसेने काम केलेलं नाही. यापुढे ते करण्याचा प्रश्नच येत नाही, मी आता लोकांसाठी काम करणार आहे. तसंच अम्मा […]

Mumbaitak
follow google news

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचं घोडामैदान जवळ आलं आहे. अशात AIADMK मधून निलंबित करण्यात आलेल्या आणि दिवंगत जयललिता यांच्या अत्यंत जवळच्या सहकारी शशिकला यांनी मोठी घोषणा केली आहे. शशिकला यांनी राजकीय आयुष्यातून संन्यास घेतला आहे. मी आजवर कोणत्याही पदाच्या लालसेने काम केलेलं नाही. यापुढे ते करण्याचा प्रश्नच येत नाही, मी आता लोकांसाठी काम करणार आहे. तसंच अम्मा म्हणजेच जयललिता यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणार आहे अशी प्रतिक्रिया शशिकला यांनी राजकीय जीवनातून संन्यास घेतल्यावर दिली आहे. तसंच तामिळनाडूमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत डीएमकेचा पराभव करण्यासाठी एआयडीएमकेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र रहावं असंही आवाहन त्यांनी केलं आहे.

हे वाचलं का?

आणखी काय म्हणाल्या शशिकला?

“मी आता राजकारणापासून कायमची दूर जाते आहे. मी राजकीय संन्यास घेतला आहे. मात्र मी अम्मा म्हणजेच जयललिता यांच्यासाठी कायमच प्रार्थना करत राहिन. त्या माझ्यासाठी देवीसारख्या होत्या. अम्मा यांनी म्हटलं होतं, की डीएमके म्हणजे दुष्ट शक्ती आहेत. त्यामुळे अम्मांच्या कार्यकर्त्यांनी डीएमकेच्या उमेदवारांना हरवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत. तामिळनाडूत पुन्हा AIADMK चं राज्य यावं यासाठी कंबर कसून कामाला लागलं पाहिजे. मी तामिळनाडूच्या जनतेची कायम आभारी असेन. मी आता राजकारणापासून कायमची दूर होते आहे.”

जयललिता या मला माझ्या बहिणीप्रमाणे होत्या. त्यांच्या दुःखद निधनाचा धक्का मी अजूनही पचवू शकलेले नाही. मी राजकारणात सक्रिय असताना कधीही सत्तेची किंवा पदाची अपेक्षा ठेवली नाही. आता मी राजकीय संन्यास घेते आहे. २७ जानेवारी २०२१ ला शशिकला यांची तुरुंगातून सुटका झाली. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जमवल्यामुळे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. जानेवारीत त्यांची सुटका झाल्यानंतर राजकीय जाणकार असा अंदाज वर्तवत होते की शशिकला तामिळनाडूची विधानसभा निवडणूक लढवतील. AIADMK मधून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी त्यांचा भाचा दिनाकरन च्या नावानेही पक्षही स्थापन केला होता. मात्र राजकीय जाणकारांचे सगळे अंदाज चुकवत आज शशिकला यांनी राजकीय आयुष्यातूनच संन्यास घेतला आहे.

    follow whatsapp