‘वाचवा, मला वाचवा, ड्राइव्हर मला किडनॅप करतोय’; पुणे सिटी बसमधील व्हिडीओ होतोय व्हायरल

स्वानंद बिक्कड

• 07:11 AM • 15 Oct 2022

पुणे महानगर परिवहन मंडळ अर्थात पीएमपीएमएलच्या सिटी बसमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.या व्हिडियोमध्ये एक तरुण मला माझ्या ऑफिस समोर सोडा म्हणून ड्राइव्हरच्या केबिनमध्ये जोरजोरात आरडाओरडा करत आहे. वाचवा रे वाचवा. मला वाचवा! मला ड्रायव्हर किडनॅप करत आहे. ड्रायव्हर मला त्रास देत आहे,अशा प्रकारचा आरडाओरडा करताना हा तरुण या व्हिडिओमध्ये दिसत […]

Mumbaitak
follow google news

पुणे महानगर परिवहन मंडळ अर्थात पीएमपीएमएलच्या सिटी बसमधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.या व्हिडियोमध्ये एक तरुण मला माझ्या ऑफिस समोर सोडा म्हणून ड्राइव्हरच्या केबिनमध्ये जोरजोरात आरडाओरडा करत आहे. वाचवा रे वाचवा. मला वाचवा! मला ड्रायव्हर किडनॅप करत आहे. ड्रायव्हर मला त्रास देत आहे,अशा प्रकारचा आरडाओरडा करताना हा तरुण या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

हे वाचलं का?

या व्हिडिओची चर्चा जोरात सुरु आहे. दीड मिनिटाचा हा व्हिडीओ जो समोर आला आहे. याबाबत व्हिडीओ बघून माहिती मिळतेय ती अशी की, चिंचवडवरून बालेवाडीकडे जाणाऱ्या बसमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. बसमधील एका प्रवाशाने हा सगळा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. या व्हिडिओत हा तरुण सिटी बसच्या ड्राइव्हरशी हुज्जत घालताना दिसत आहे. मला उतरू द्या, असं तो म्हणत आहे.

दरवाजा उघडा म्हणून ओरडू लागला तरुण

मागे स्टॉप असताना का उतरले नाही? दरवाजा आता उघडणार नाही, असं ड्रायव्हर त्या तरुणाला सांगतो. तरी दरवाजा उघडायचा हट्ट तो तरुण करतो. दरवाजा उघडत नाही हे लक्षात येताच तो तरुण जोरजोरात ओरडू लागला. मला वाचवा. ड्राइव्हर मला त्रास देतोय, मला किडनॅप करतोय, असं म्हणत तो तरुण जोरजोरात ओरडू लागला. सोबत तोंडावर हात मारत बोंबलू लागला.

आवाज ऐकून लोकांची गर्दी

ओरडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूने जाणारे लोक देखील तिथे थांबले. नेमकी भानगड काय आहे? हा तरुण का ओरडतोय, हे त्यांना समजत नव्हतं. बस समोर काय सुरूय हे पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. काहींनी त्याला ओरडतो कशाला? अशी विचारणा देखील केली, तरी त्या तरुणाचं ओरडणं सुरूच होतं. तो जोरजोरात ओरडत जातो. स्टेरिंगजवळील बटणं दाबत होता. स्टेरिंगच्या बाजूच्या भागात जोरजोरात हातानं मारत होता. त्यामुळं बसमधील प्रवासी देखील हैराण झाले होते. त्यापैकी एकानं हा सगळं प्रकार आपल्या कॅमेरात कैद केला आणि सोशल मीडियावर शेअर केला असेल. त्यामुळे कालपासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

    follow whatsapp