कोरोना लसीचा दुसरा डोस सोमवारपासून देणार

मुंबई तक

• 03:18 PM • 13 Feb 2021

मुंबई तकः महाराष्ट्रात कोरोना लसीचा दुसरा डोस सोमवारपासून देण्यास सुरुवात होणार आहे. ज्यांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ही सोमवारी दुसरा डोस देण्यात येणार आहे. ज्यामध्ये डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. शुक्रवारपर्यंत (12 फेब्रुवारी) 6,48, 573 जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला […]

Mumbaitak
follow google news

मुंबई तकः महाराष्ट्रात कोरोना लसीचा दुसरा डोस सोमवारपासून देण्यास सुरुवात होणार आहे. ज्यांनी करोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांना ही सोमवारी दुसरा डोस देण्यात येणार आहे. ज्यामध्ये डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

हे वाचलं का?

राज्यात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. शुक्रवारपर्यंत (12 फेब्रुवारी) 6,48, 573 जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. ज्यामध्ये 5 लाख 35 हजार 621 हेल्थ वर्कर्स तर 1 लाख 12 हजार 952 फ्रंट लाईन वर्कर्स आहेत. त्यापैकी 5,524 लाभार्थ्यांना कोवॅक्सीनची लस देण्यात आली आहे. तर मुंबईत 1 लाख 7 हजार 725 जणांनी लस घेतली आहे.

पहिल्या दिवशी 18, 582 हेल्थकेअर वर्कर्सना राज्यात लस देण्यात आली होती. तर, मुंबईत 1957 जणांना पहिल्या दिवशी लस घेतली होती. 15 फेब्रुवारीला लसीचा दुसरा डोस देण्यात येणार असून

स्त्रियांचा लसीकरणाला चांगला प्रतिसाद

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत लस घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये महिला कर्मचारी आघाडीवर आहेत. 52 टक्के महिला आणि 48 टक्के पुरुष कर्मचाऱ्यांनी लसीकरणाला प्रतिसाद दिला आहे.

    follow whatsapp