सांगलीत कृष्णा नदीच्या सात दिवस चालणाऱ्या उत्सवाला सुरूवात

मुंबई तक

• 12:55 PM • 17 Dec 2021

स्वाती चिखलीकर, प्रतिनिधी, सांगली भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाच्या जलसंपदा विभागाकडून आजपासून सांगलीच्या कृष्णा नदीच्या घाटावर कृष्णा नदी उत्सवाला सुरवात झाली. पुढील सात दिवस सांगलीत विविध कार्यक्रम आई उपक्रमांनी कृष्णा नदी उत्सव साजरा केला जाणार आहे. महापालिकेसह विविध शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यानी यात सहभाग घेतला यानिमित्त आज सांगलीच्या कृष्णेच्या घाटावर कलश पूजन करत या सात दिवसांच्या […]

Mumbaitak
follow google news

स्वाती चिखलीकर, प्रतिनिधी, सांगली

हे वाचलं का?

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाच्या जलसंपदा विभागाकडून आजपासून सांगलीच्या कृष्णा नदीच्या घाटावर कृष्णा नदी उत्सवाला सुरवात झाली. पुढील सात दिवस सांगलीत विविध कार्यक्रम आई उपक्रमांनी कृष्णा नदी उत्सव साजरा केला जाणार आहे. महापालिकेसह विविध शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यानी यात सहभाग घेतला

यानिमित्त आज सांगलीच्या कृष्णेच्या घाटावर कलश पूजन करत या सात दिवसांच्या कृष्णा नदी उत्सवाला सुरवात झाली. यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, सूर्यकांत नलवडे, सचिन पवार, राजन डवरी , महापालिकेचे सहायक आयुक्त नितीनकाका शिंदे, सामाजिक कार्यकर्ते सतीश दुधाळ, अधीक्षक जे.के महाडिक यांच्यासह शासकीय निमशासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

आजपासून नदी घाटाची स्वछता हाती घेण्यात आली असून पुढील दोन दिवस कृष्णा नदीच्या सर्व घाटाची स्वच्छता केली जाणार आहे. पुढील सात दिवस कृष्णा नदीच्या उत्सवानिमित्त होत असणाऱ्या विविध कार्यक्रमात जलसंपदा, महानगरपालिका, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, एनजीओ, शालेय शिक्षण विभाग, प्रदूषण महामंडळ, कृषी विभाग आणि जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय यांचे अधिकारी आणि कर्मचारी या मोहिमेत सहभागी होणार आहेत. आजच्या स्वच्छता मोहिमेत महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी यांनीही सहभाग घेत उपक्रमात सहभाग घेतला. दोन तास झालेल्या स्वच्छता मोहिमेत कचरा संकलित करण्यात आला. हा सर्व कचरा महापालिका प्रशासनाकडून तात्काळ उचलण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जलसंपदा विभागाच्या प्रतिनिधी संगीता मोरे यांनी केले. या कृष्णा नदी घाटाच्या स्वच्छता मोहिमेचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले.

या स्वच्छता मोहिमेत महापालिकेचे 110 कर्मचारी आणि 10 घंटागाड्यांच्या सहभागाने स्वच्छतेला सुरुवात झाली आहे.

जलसंपदा विभागाकडून कृष्णा नदी घाटावर राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमेत महापालिकेचे 110 कर्मचारी आणि 10 घंटागाड्यांचा ताफा सहभागी झाला होता. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या टीमकडून स्वछता करीत गोळा झालेला कचरा संकलन करण्यात आला आहे.

    follow whatsapp