वर्ध्यात कार पुलावरून कोसळून भीषण अपघात, मेडिकलच्या सात विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुंबई तक

• 02:19 AM • 25 Jan 2022

सुरेंद्र रामटेके, प्रतिनिधी, वर्धा वर्ध्यात एका SUV कारचं नियंत्रण सुटल्याने एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मेडिकलला शिकणाऱ्या सात जणांचा मृत्यू झाला आहे. देवळी या ठिकाणाहून वर्धा या ठिकाणी येत असताना सेलसुरा या ठिकाणी हा अपघात झाला. चालकाचं वाहनावरून नियंत्रण सुटल्याने सेलसुरा नदीच्या पुलावरून कार खाली कोसळली. सुमारे 40 फूट पुलावरून ही कार कोसळल्याने […]

Mumbaitak
follow google news

सुरेंद्र रामटेके, प्रतिनिधी, वर्धा

हे वाचलं का?

वर्ध्यात एका SUV कारचं नियंत्रण सुटल्याने एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मेडिकलला शिकणाऱ्या सात जणांचा मृत्यू झाला आहे. देवळी या ठिकाणाहून वर्धा या ठिकाणी येत असताना सेलसुरा या ठिकाणी हा अपघात झाला. चालकाचं वाहनावरून नियंत्रण सुटल्याने सेलसुरा नदीच्या पुलावरून कार खाली कोसळली. सुमारे 40 फूट पुलावरून ही कार कोसळल्याने हा भीषण अपघात झाला आहे.

या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री दीडच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. तुळजापूर महामार्गावरच्या वर्धा देवळी मार्गावर ही घटना घडली. या अपघात भाजप आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कारसह एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे.

अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच वर्ध्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप, सावंगी पोलिसी निरीक्षकही घटनास्थळी तातडीनं दाखल झाले आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांमधील सर्व विद्यार्थी हे सावंगी येथील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अपघातात दगावलेल्यांचे मृतदेह वर्धा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.

अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच वर्ध्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप, सावंगी पोलिसी निरीक्षकही घटनास्थळी तातडीनं दाखल झाले आहे. या अपघातात मृत्यू झालेल्यांमधील सर्व विद्यार्थी हे सावंगी येथील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील भीषण अपघातांची मालिका सुरु असून रविवारी रात्रीपासून राज्यानं भीषण अपघात पाहिलेत. पुणे-नगर महामार्गावर रविवारी भीषण अपघात झाला होता. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे परभणीत ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात तिघा भावंडांचा बळी गेला होता. अवघ्या चोविस तासांत महाराष्ट्रात रस्ते अपघात आठ बळी गेले होते. अशातच सोमवारी रात्री आणखी एक भीषण अपघाताची घटना समोर आली असून आता रस्ते अपघातातील बळींचा आकडा आणखी वाढला आहे. वर्ध्यातील कार अपघातात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून आता गेल्या 48 तासांत तब्बल 15 जणांचा मृ्त्यू झाला आहे.

    follow whatsapp