Sexual Health Tips: जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचा पार्टनर लैंगिक संबंधात (sexual relations) रस घेत नाही किंवा तुमचं लैंगिक आयुष्य बिघडत आहे, तर यामागे काही खास कारण असू शकते. तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही ज्या वेळी लैंगिक संबंध करत आहात त्याचा तुमच्या लैंगिक आयुष्यावरही परिणाम होतो. लैंगिक संबंधांसाठी कोणती वेळ चुकीची आहे हे आपण आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घेऊया आणि यावेळी शारीरिक संबंध टाळावेत. (sexual health this is worst time for physical relationship experts told the reason)
ADVERTISEMENT
बहुतेक जोडपे रात्री लैंगिक संबंध ठेवणं चांगलं मानतात, परंतु ही वेळ तुमच्यासाठी वाईट देखील असू शकते. फ्रंटियर्स इन सायकोलॉजी या जर्नलच्या अभ्यासात असे दिसून आले होते की, पुरुष आणि स्त्रियांची लैंगिक इच्छा वाढण्याची वेगवेगळी वेळ असते.
या अभ्यासानुसार, महिलांची लैंगिक इच्छा संध्याकाळी सर्वात जास्त असते, तर पुरुषांची सकाळच्या वेळेस लैंगिक संबंधासाठी सर्वात जास्त उत्सुक असतात. या अभ्यासानुसार, बहुतेक जोडपे हे रात्री 9 ते मध्यरात्रीपर्यंतच्या वेळेत लैंगिक संबंध ठेवतात. मात्र, यासाठी एक निश्चित वेळ असलीच पाहिजे असं काही गरजेचं नसल्याचं संशोधकांचे म्हणणे आहे.
लैंगिक संबंधांसाठी कोणती वेळ योग्य?
अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे जोडपे आपली दिनचर्या लक्षात घेऊन नातेसंबंध टिकवून ठेवतात ते लैंगिकदृष्ट्या अधिक समाधानी असतात. ‘द पॉवर ऑफ व्हेन’ या पुस्तकाचे लेखक मायकेल ब्रूस यांनी ‘द हेल्दी वेबसाइट’ला सांगितले की, ‘झोपण्याच्या वेळी लैंगिक संबंध ठेवणं हे काही वाईट नाही, पण तोपर्यंत तुम्ही पूर्णपणे थकलेले असता. यावेळी, आपल्या शरीराला फक्त झोपेची आवश्यकता असते आणि लैंगिक संबंधांसाठी शरीरात ऊर्जा शिल्लक नसते.’
हे ही वाचा >> Best foods for sex life: चांगल्या सेक्स लाइफसाठी नेमकं काय-काय खावं?
अमेरिकन रिलेशनशिप आणि लैंगिक संबंधाचे थेरपिस्ट लिसा थॉमस म्हणतात, ‘प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगळी असते. काही लोकांसाठी रात्रीचे लैंगिक संबंध ठेवणं ही थकवणारी बाब असू शकते. त्याच वेळी, बहुतेक लोकांसाठी, यावेळी लैंगिक संबंध तणाव कमी करण्यासाठी आणि शरीराला आराम देण्याचे काम करते. काही लोकांना शारीरिक संबंधानंतर चांगली झोप येते.
डॉक्टर ब्रुस आणि थॉमस दोघेही मानतात की, काम संपवून रात्री एकत्र झोपल्याने शारीरिक संबंध सुधारतात. जेव्हा तुम्ही रात्री झोपता तेव्हा तुमच्या शरीरात हार्मोन्स तयार होतात आणि तुम्ही पूर्ण उर्जेने उठता, त्यामुळे लैंगिक समाधान मिळण्याची शक्यता वाढते. डॉक्टर ब्रूस म्हणतात, ‘सकाळ ही लैंगिक संबंधासाठी सर्वोत्तम वेळ आहे.’
हे ही वाचा >> Sexually Fit: लग्न ठरलेल्या पुरुषांनी ‘या’ गोष्टीकडे करू नये दुर्लक्ष, नाहीतर…
डॉ. थॉमस सांगतात की वेगवेगळ्या वेळापत्रकामुळे प्रत्येक जोडप्याला सकाळी लैंगिक संबंध ठेवणं शक्य होत नाही. म्हणून लोकांनी त्यांच्या लैंगिक संबंधाच्या वेळेबद्दल अधिक सर्जनशील असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी दुपारचा वेळ देखील काढू शकता.
डॉक्टर थॉमस सांगतात, ‘तथापि, जोडपे आपलं लैंगिक आयुष्य सुधारण्यासाठी त्यांच्या सोयीनुसार वेळ काढतात. जे जोडपे तणाव दूर करण्यासाठी लैंगिक संबंध ठेवतात, त्यांचे लैंगिक जीवन दीर्घकाळ चांगले राहते.
ADVERTISEMENT