Sex Health: Couple चं सेक्स लाइफ कसं होतं खराब?, कारण…

मुंबई तक

18 Oct 2023 (अपडेटेड: 09 Nov 2023, 03:02 PM)

Couple Sex Health: जर जोडप्यावर मूल होण्यासाठी दबाव असेल तर ते त्यांच्या लैंगिक जीवनाचा आनंद घेऊ शकत नाहीत. याशिवाय, या काळात येणारा ताण भविष्यातील लैंगिक अनुभव देखील खराब करतो.

sexual health tips pressure to have a child early spoils couples sex life know how

sexual health tips pressure to have a child early spoils couples sex life know how

follow google news

Sex Health Tips: लग्न होताच, सहसा घरातील वडीलधारी मंडळी विवाहित जोडप्याला मूल व्हावं यासाठी दबाव टाकतात. अनेकवेळा या गोष्टीचा अधिक दबाव येऊ लागतो. विशेषतः मुलींना याचा जास्त सामना करावा लागतो. त्यामुळे ते जोडपे अस्वस्थ होते आणि मानसिकदृष्ट्या तयार नसतानाही गर्भधारणेचा प्रयत्न करू लागतात. अशा परिस्थितीत, योग्य वेळी योग्य स्थितीत लैंगिक संबंध (sex life)होणं हे एक प्रकारे एखाद्या कामासारखं होऊन जातं, ज्यामुळे कधीकधी तणाव देखील येत. तसेच, पार्टनरमध्ये लैंगिक संबंधांबद्दल उत्साह नसतो, ज्याचा त्यांच्या जीवनावर दीर्घकाळ प्रभाव पडतो. (sexual health tips pressure to have a child early spoils couples sex life know how)

हे वाचलं का?

केवळ गर्भधारणेसाठी लैंगिक संबंध ठेवणं तणावपूर्ण

दबावाखाली गर्भधारणेचा प्रयत्न करणे खूप तणावपूर्ण आहे. कारण दोन ते तीन वेळा गर्भधारणा होऊ शकली नाही, तर त्या जोडप्याला कारण शोधण्यासाठी डॉक्टरांकडे जावे लागते. जिथे त्यांना काही काळ लैंगिक संबंध ठेवण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये लैंगिक संबंध एका ठराविक वेळेत करावा लागतो, ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते. अशा स्थितीत अनेकवेळा जोडप्याला वाटत नसतानाही लैंगिक संबंध ठेवावे लागतात, जो खूप वाईट अनुभव असतो.

हे ही वाचा>> Extra Marital Affairs: ‘…म्हणून महिलांचे विवाहबाह्य संबंध असतात’, सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर

Timed Sex चे दुष्परिणाम

जर्नल ऑफ एंड्रोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, वेळेनुसार लैंगिक संबंध (Timed Sex) केल्यानंतर सहा महिन्यांनंतर, दहापैकी चार पुरुषांनी सांगितले की त्यांना इरेक्टाइल डिसफंक्शन किंवा नपुंसकत्व आलं आहे. काही लोकांनी सांगितले की, ते त्यांच्या जोडीदारासोबत नियोजित वेळी लैंगिक संबंध ठेवायचे टाळतात आणि दहापैकी एकाने विवाहबाह्य संबंध सुरू केले आहेत.

गर्भधारणेच्या दबावामुळे लैंगिक जीवन कसे होते खराब?

अनेक आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गर्भधारणेच्या इच्छेचा लैंगिकतेकडे पाहण्याच्या तुमच्या वृत्तीवर थेट परिणाम होतो. जर तुमचे लक्ष लैंगिक संबंधा दरम्यान तुम्हाला मिळणाऱ्या आनंदावर नसेल तर तुमची कामवासना कालांतराने कमी होत जाते. शेवटी, यामुळे इच्छा कमी होणे, लैंगिक संबंधात रस नसणे आणि असमाधानकारक लैंगिक जीवन यामुळे जोडीदारासोबत समस्या उद्भवू शकतात.

हे ही वाचा>> Sexual Health Tips: लैंगिक संबंध ठेवताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर…

गर्भधारणा होण्यास उशीर झाल्यामुळे जोडीदारामध्ये होते अंतर निर्माण

जेव्हा गर्भधारणेचे प्रयत्न वारंवार अयशस्वी होतात तेव्हा तणाव जोडीदारामध्ये भावनिक अंतर निर्माण करतं. म्हणून, प्रेग्नंसीपूर्वी जोडप्याने एकमेकांना योग्यरित्या समजून घेणे महत्वाचे आहे. याबद्दल मोकळेपणाने बोलणं गरजेचं आहे.

    follow whatsapp