राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आजच ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर बुधवारी शस्त्रक्रिया होणार होती. मात्र आज त्यांना पुन्हा एकदा पोटदुखीचा त्रास होतो आहे त्यामुळे त्यांना आजच रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विट करून दिली आहे. शरद पवार यांची प्रकृती रविवारी संध्याकाळी बिघडली होती. त्यांना त्यावेळी ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पित्ताशयाचा त्रास झाल्याने त्यांना पोटात दुखू लागलं होतं. त्यांच्या तपासण्या केल्यानंतर त्यांच्यावर बुधवारी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता त्यांना आजच रूग्णालयात दाखल करण्यात आलं.
ADVERTISEMENT
शरद पवार आणि अमित शाह यांच्या भेटीची बातमी म्हणजे अफवा – नवाब मलिकांचं स्पष्टीकरण
शरद पवारांना झालंय काय?
शरद पवार यांना रविवारी संध्याकाळी त्यांना पोटदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयात नेण्यात आलं होतं. त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास आहे हे समजलं. सध्या त्यांची Blood Thinning वर सुरू असलेली औषधं थांबवण्यात आली आहेत. ३१ मार्चला त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात येईल आणि एंडोस्कोपी आणि सर्जरी करण्यात येईल असं रूग्णालयातर्फे सांगण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांचे पुढचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
दोन दिवसांपासून शरद पवार यांची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होती. कारण त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी रविवारी दुपारी समोर आली होती. मात्र शरद पवार यांनी याबद्दल काहीही भाष्य केलं नव्हतं. शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारचं काय होणार असाही प्रश्न चर्चिला गेला.. तसेच राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. मात्र त्याच दिवशी नवाब मलिक यांनीही अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर समोर आली ती त्यांची प्रकृती बिघडल्याची बातमी. त्यांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं होतं. तपासण्या झाल्यानंतर त्यांच्यावर सर्जरी करण्याचा निर्णयही झाला. मात्र आता आजच पुन्हा एकदा त्यांच्या पोटात दुखू लागलं आहे त्यामुळे त्यांना आजच ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT