शरद पवार यांनी महाराष्ट्र दौरा केला की ते सत्तेत येतात- सुप्रिया सुळे

मुंबई तक

• 07:01 AM • 29 Sep 2022

वसंत मोरे, बारामती इंदापूर: लोकसभा निवडणूक 2024 ची रंगत आताच सुरु झाली आहे. एकाबाजूला भाजपनं राज्यात मिशन 45 चं लक्ष ठेवत 16 विविध मतदारसंघात थेट केंद्रातून मंत्री पाठवले आहेत. अशातच नुकत्याच बारामती लोकसभा मतदार संघात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येऊन गेल्या. त्यांनी तीन दिवस बारामतीचा दौरा केला. आता बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळेंनी इंदापूरमध्ये सभा […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

वसंत मोरे, बारामती

हे वाचलं का?

इंदापूर: लोकसभा निवडणूक 2024 ची रंगत आताच सुरु झाली आहे. एकाबाजूला भाजपनं राज्यात मिशन 45 चं लक्ष ठेवत 16 विविध मतदारसंघात थेट केंद्रातून मंत्री पाठवले आहेत. अशातच नुकत्याच बारामती लोकसभा मतदार संघात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येऊन गेल्या. त्यांनी तीन दिवस बारामतीचा दौरा केला. आता बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळेंनी इंदापूरमध्ये सभा घेतली त्यामध्ये त्यांनी काही वक्तव्य केली आहेत.

सुप्रिया सुळे इंदापूरच्या सभेत काय म्हणाल्या?

”निवडणुकीमध्ये पडझड होत असते हे आमच्यापेक्षा कुणीही जास्त जवळून पाहिलेला नाही, कारण शरद पवार यांचे राजकारण व समाजकारण जर पाहिले तर 55 वर्षाच्या काळात जेवढे चढ आहेत तेवढेच उतार आहेत. 55 वर्षात 27 वर्ष सत्तेमध्ये आणि 27 वर्षे विरोधात गेली आहेत. मी त्यांना नेहमीच सांगते, महाराष्ट्राने तुम्हाला प्रचंड प्रेम दिलेच पण विरोधात असताना महाराष्ट्राने तुम्हाला सर्वात जास्त प्रेम दिल आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. विरोधात असताना ते दौऱ्यावर निघतात पण त्या दौऱ्यामध्ये काय गंमत होते माहिती नाही, काही दिवस एक महाराष्ट्राचा दौरा झाला की ते पुन्हा सत्तेत येऊन बसतात” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

मी आरक्षणाच्या जागेवरून निवडणूक लढवणार नाही- सुप्रिया सुळे

”राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महिलांसाठी आरक्षण आणले. महिला उंबरठा ओलांडून निर्णय प्रक्रियेत आल्या. ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेमध्ये महिला आल्या, आता आपली इच्छा आहे की, लोकसभा आणि विधानसभेमध्ये देखील महिला यायला हव्यात, राष्ट्रवादी काँग्रेसची आरक्षणाची मागणी आहेच, पण मी आरक्षणातून लढणार नाही, मी सर्वसाधारण ओपन सीटमधून लढणार आहे. मी कुठल्या तोंडाने आरक्षण मागणार आहे.

मी शिकले सवरलेली असून ओपन सीट मधून निवडून आलेली आहे” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्याच्यामुळे मी आरक्षणामधून उमेदवारी मागणार नाही. पण कुठल्याही महिलेला गरज असेल तिच्या पाठीमागे खंबीर उभी राहणार आहे. कारण त्यांना तेवढे शिक्षण मिळाले नाही, खासदारकीची संधी मिळालेली नाही असं सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळेंनी सांगितला परदेशातील साडी घालून फिरण्याच किस्सा

मी ज्यावेळेस परदेशात पॅन्ट घालून रस्त्याने चालते त्यावेळेस कोणी बघत पण नाही ते म्हणतात कोणीतरी भारतीय मुलगी चालली आहे. मात्र मी जेव्हा साडी नेसून परदेशात रस्त्यावर उतरते त्यावेळेस मला विचारतात, इंडियन? व्हेरी ब्युटीफुल साडी! द वे टू बाय इंडिया या गोष्टी अनेक वेळा झाल्यात… न्यूयॉर्कमध्ये देखील झाले आहे असा सुप्रिया सुळेंनी यावेळी सांगितला.

आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यासपीठावरच सांगितला लग्नाचा किस्सा…

इंदापूर तालुक्यातील रस्ते पूर्वी खराब होते. अनेक मुला मुलींची लग्न देखील होत नव्हती. ही वस्तुस्थिती आपण बदलून गावोगावी रस्ते केले. हे सांगत आमदार दत्तात्रय भरणे यांनी सध्या सुरू असलेल्या नवरात्र महोत्सवामध्ये देवीची शपथ घेऊन सांगतो ही खरी परिस्थिती आहे, असे म्हणताच उपस्थितांमध्ये महिला वर्गात देखील हशा पिकला.

    follow whatsapp