रात्रीस खेळ चाले…मधून ‘शेवंता’ची माघार, चॅनलसह प्रोडक्शन हाऊसवर गेले गंभीर आरोप

मुंबई तक

• 07:38 AM • 25 Nov 2021

झी मराठी वाहिनीवर गाजलेल्या रात्रीस खेळ चाले या मालिकेत शेवंता हे पात्र साकारणारी अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरने यापुढे मालिकेत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्रीस खेळ चाले मालिकेच्या तिसऱ्या हंगामाची नुकतीच घोषणा करण्यात आली होती. परंतू त्याआधीच अपुर्वाने आपण मालिका सोडत असल्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अपुर्वाने आपल्या फेसबूक पेजवर […]

Mumbaitak
follow google news

झी मराठी वाहिनीवर गाजलेल्या रात्रीस खेळ चाले या मालिकेत शेवंता हे पात्र साकारणारी अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरने यापुढे मालिकेत काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. रात्रीस खेळ चाले मालिकेच्या तिसऱ्या हंगामाची नुकतीच घोषणा करण्यात आली होती. परंतू त्याआधीच अपुर्वाने आपण मालिका सोडत असल्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

हे वाचलं का?

अपुर्वाने आपल्या फेसबूक पेजवर आपली बाजू मांडतं प्रोडक्शन हाऊससह चॅनलवरही गंभीर आरोप केले आहेत. शेवंता म्हणून आपल्याला मिळालेली ओळख आणि त्यानंतर प्रेक्षकांशी जोडलेलं नात हे मला खूप समाधान देऊन गेलं. परंतू ज्या भूमिकेसाठी मी १० किलो वजन वाढवलं, त्यावरुन निगेटीव्ह कमेंट्स सहन केल्या…त्याच वजनावरुन ज्येष्ठ कलाकारांनी आणि काही नवख्यांनी माझं विडंबन करुन खिल्ली उडवल्याचं अपुर्वाने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आपल्या फेसबूक पोस्टमध्ये अपुर्वाने आपल्याविरुद्ध जिव्हारी लागणाऱ्या काही कमेंट्स केल्या गेल्याचं म्हटलं आहे. याचसोबत सावंतवाडीत शुट सुरु असताना मी मुंबईवरुन १२ तासांचा प्रवास करुन जायचे…परंतू मला बोलावून नंतर १ दिवस शुट करुन पुढचे ३-४ दिवस काहीच काम नसायचं. ज्यात माझा अमुल्य वेळ वाया जात होता असंही अपुर्वाने म्हटलं आहे.

तिसऱ्या सिझनसाठी प्रोडक्शन हाऊसकडून अपुर्वाला ५-६ दिवसांसाठी तुझी गरज लागणार आहे असं सांगण्यात आल्यानंतर अपुर्वाने याला नकार दिला. यानंतर प्रोडक्शन हाऊसने तिला आणखी एक शो देण्याचं आश्वासन दिलं…परंतू याला बराच कालावधी उलटून गेल्यानंतरही हे आश्वासन पाळण्यात आलेलं नसल्याचा आरोप अपुर्वाने केला आहे. याचसोबत झी युवा वाहिनीवरील एका मालिकेच्या मानधनाचा चेक अद्याप मिळालेला नसल्याचं म्हणत अपुर्वाने या प्रकरणात आपलं आर्थिक नुकसान होत असल्याचं म्हटलं आहे.

चॅनलशी प्रामाणिक राहूनही आपल्या कष्टाची जिथे अवहेलना होत असेल आणि नवख्या कलाकारांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असेल तर अशा ठिकाणी काम करणं आपल्या तत्वात बसत नसल्याचं सांगत अपुर्वाने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

शेवंताच्या अदांवर चाहते झाले फिदा

    follow whatsapp