शिवाजी पार्क की बीकेसी मैदान… कुणाच्या दसरा मेळाव्याचा आवाज घुमणार याची चर्चा सुरू असतानाच ठाकरेंना शिंदेंनी आणखी एक झटका दिलाय. आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळी मतदारसंघातच शिवसेनेला गळती लागली. आज हजाराहून अधिक शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला.
ADVERTISEMENT
मुंबईसह महाराष्ट्रात चर्चा आहे ती, कुणाचा दसरा मेळावा जोरदार होणार? बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने शक्तिप्रदर्शन करण्यासाठी ताकद लावण्याचं दिसत आहे. दुसरीकडे ठाकरेंकडूनही शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे.
सगळ्यांचं लक्ष दसरा मेळाव्याकडे लागलेलं असताना आज आदित्य ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या वरळीत शिवसेनेला गळती लागली. एकनाथ शिंदेंकडून आदित्य ठाकरेंना त्यांच्या मतदारसंघातच कुमकुवत करण्याचा हा प्रयत्न असल्याचं म्हटलं जात आहे.
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातल्या ५०० ते हजार शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाला पाठिंबा दिलाय. आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून ६५ हजार मतांनी विजयी झाले होते.
शहाजी पाटलांनी थेट उद्धव ठाकरेंनाच केलं लक्ष्य; म्हणाले, ‘हे तोंडी शोभून दिसत नाही’
शिवसेनेतल्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांवर सातत्यानं टीकेचे बाण डागले जात आहेत. आदित्य ठाकरेंकडून मुंबईतल्या बंडखोर आमदारांविरोधात निष्ठा यात्रेतून, तर राज्यातल्या बंडखोर शिवसेना आमदारांविरोधात शिव संवाद यात्रेतून टीका होताना दिसतेय.
आदित्य ठाकरेंकडून बंडखोर आमदारांवर लक्ष्य केलं जात असून, आता शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं दिसतंय. पावसाळी अधिवेशनापासून शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंवर टीका सुरू झाली असून, आता थेट मतदारसंघातच शिंदे गटाने झटका दिलाय.
वरळीतल्या शिवसैनिकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्यावर एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“दररोज वेगवेगळ्या भागातून विविध पक्षाचे कार्यकर्ते शिवसेनेत येताहेत. ते समर्थ देताहेत. आज देखील हजारोंच्या संख्येनं विविध भागातील पदाधिकारी शिवसेनेत दाखल झाले. त्यांनी पाठिंबा देखील दर्शवला आहे. मुंबईतील पदाधिकारी, कार्यकर्ते मला भेटले. कोळी वाड्यातील बंधू भगिनी इथे आले होते. एक चांगलं सरकार स्थापन झालं आहे. सर्वसामान्यांचं सरकार स्थापन झाल्याच्या त्यांच्या भावना आहेत. त्यामुळे ते प्रवेश करत आहेत”, असं शिंदे म्हणाले.
“वरळीमधून यापूर्वीही आले. आजही आले. मुंबईतील विविध भागातून कार्यकर्ते येत आहेत. त्यांचंदेखील मी स्वागत करतोय. जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन पुढे जाऊयात. त्यांना न्याय द्यायची भूमिका आहे. कोळी बांधव हे भूमिपुत्र आहेत. त्यांची गावठाणं आहेत. त्यांचेही काही प्रश्न आहेत. कोस्टल रोडसंदर्भातही त्यांच्या सूचना आणि प्रश्न आहेत. हे सरकार त्यांना न्याय देईल”, असंही शिंदे म्हणाले.
‘पहिले तू सुधार, लोकांचं काय पाहतो’; गुलाबराव पाटलांचा चंद्रकांत खैरेंवर पलटवार
“प्रतापराव जाधव आमचे खासदार आहेत. ती त्यांची भूमिका त्यांनी मांडलीये. ते खासदार आहेत. त्यांच्याकडे काही माहिती असेल, त्यामुळे ते बोलले”, असं सांगत शिंदेंनी अधिकचं भाष्य करणं टाळलं.
ADVERTISEMENT