शिवसेनेचे वाघ असतात आणि वाघांचा बाजार मांडला जात नाही-आदित्य ठाकरे

मुंबई तक

• 07:42 AM • 12 Feb 2022

शिवसेनेचे वाघ असतात आणि वाघांचा बाजार नसतो अशी रोखठोक भूमिका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गोव्यात घेतली आहे. गोव्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोव्यात निवडणुकीच्या नंतर घोडेबाजार होऊ शकतो अशी शक्यता आहे त्यावर आपलं मत काय असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी शिवसेनेचे वाघ असतात आणि वाघांचा बाजार भरत नसतो असं उत्तर आदित्य […]

Mumbaitak
follow google news

शिवसेनेचे वाघ असतात आणि वाघांचा बाजार नसतो अशी रोखठोक भूमिका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गोव्यात घेतली आहे. गोव्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोव्यात निवडणुकीच्या नंतर घोडेबाजार होऊ शकतो अशी शक्यता आहे त्यावर आपलं मत काय असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी शिवसेनेचे वाघ असतात आणि वाघांचा बाजार भरत नसतो असं उत्तर आदित्य ठाकरेंनी दिलं आहे. तसंच आम्ही ही निवडणूक लढवत आहोत कारण आम्हाला इथल्या भूमिपुत्राचा विकास करायचा आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

भाजपसोबत आमची युती होती, त्यामुळे इतके दिवस आम्ही त्यांचा विचार करून निवडणूक लढवत नव्हतो. मित्र पक्षाला त्रास द्यायचा नाही, त्यांचा सीट शेअर कमी करायचा नाही असं आमचं धोरण होतं. मात्र भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे आता जिथे आमचं अस्तित्व होतं तिथे आता आम्ही पुन्हा तयारीला लागलो आहोत असंही आदित्य ठाकरे म्हणाले. आम्ही गोव्यात ११ जागा लढवत आहोत. घरोघरी जाऊन प्रचार केला जातो आहे. शिवसेनेचं जे काही असतं ते खुलेपणाने आणि पारदर्शकपणे असतं.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हातात दोन घड्याळं का घालतात माहित आहे का?

भाजपचे लोक जर हे म्हणत आहेत की आमच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होणार आहे, आमचे उमेदवार कमकुवत आहेत. मग त्यांना भाजप घाबरतं का? होऊद्या प्रचार असं थेट आव्हानही आदित्य ठाकरे यांनी भाजपला दिलं आहे.

उत्पल पर्रिकर यांच्याबाबतीतही शिवसेनेने जो निर्णय घेतला तो निर्णयही खुलेपणाने घेतला आहे. आम्ही त्यांच्यासोबतही काहीही बंद दाराआड चर्चा केली नाही. आता आम्ही प्रचाराची जी काही धामधूम पाहतो आहोत त्यातून आम्हाला हे जाणवलं आहे की गोव्यातल्या घरोघरी शिवसेना पोहचली आहे. आम्हाला आता प्रचारादरम्यान ही बाब जाणवली आहे. आमचे ११ आमदार या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. शिवसेना म्हणून लढत असताना आम्ही यापुढच्या सगळ्या निवडणुका लढू. महाराष्ट्रातून बाहेरही शिवसेनेची गरज आहे हे आम्हाला जाणवू लागलं आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच आमचे आमदार कुठलीही वेगळी शपथ घेणार नाहीत थेट विधानसभेची शपथ घेतील असंही त्यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp