संकटात सापडल्यानंतरच शिवसेनेला बाळासाहेबांची आठवण येते – मनसेची बोचरी टीका

मुंबई तक

01 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:50 AM)

संपूर्ण राज्यभरात आज महाराष्ट्र दिनाचा उत्साह आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असून या सभेच्या निमीत्ताने पुन्हा एकदा मनसे विरुद्ध शिवसेना हा वाद रंगायला लागला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्ष प्रवक्त्यांना बैठकीत राज ठाकरेंवर टीका करताना भाजपसह सर्व विरोधकांवर तुटून पडा असे आदेश दिले होते. यानंतर मनसेने […]

Mumbaitak
follow google news

संपूर्ण राज्यभरात आज महाराष्ट्र दिनाचा उत्साह आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार असून या सभेच्या निमीत्ताने पुन्हा एकदा मनसे विरुद्ध शिवसेना हा वाद रंगायला लागला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्ष प्रवक्त्यांना बैठकीत राज ठाकरेंवर टीका करताना भाजपसह सर्व विरोधकांवर तुटून पडा असे आदेश दिले होते.

हे वाचलं का?

यानंतर मनसेने पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचताना, संकटात सापडल्यानंतर शिवसेनेला बाळासाहेबांची आठवण येते अशी बोचरी टीका केली आहे.

Thackeray Vs Thackeray: ‘याला माकडचाळे म्हणतात…’, राज ठाकरेंच्या ‘हिंदुत्वा’वर CM ठाकरे कडाडले

संकटात सापडल्यामुळेच शिवसेना सध्या इतकी घायकुतीला आली असून, अशी काही परिस्थिती निर्माण झाली की मगच त्यांचा बाळासाहेबांची आठवण येते अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. राज साहेबांचं पोस्टर पाहून जर कोणाला बाळासाहेबांची आठवण येत असेल तर ते चांगलंच आहे. आम्ही असं कधीच म्हटलं नाही की राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे बनण्याचा प्रयत्न करत आहेत. बाळासाहेब फक्त एकच होते आणि एकच राहतील. परंतू आता संकटात सापडल्यामुळेच शिवसेनेला राज ठाकरेंना हिंदूजननायक या शब्दावर आक्षेप असल्याचं देशपांडेंनी मुंबई तक शी बोलताना सांगितलं.

औरंगाबादला दाखल झाल्यानंतर मनसेने जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. भगवी शाल घातलेलं राज ठाकरेंचं पोस्टर लावून मनसेने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. ज्यानंतर शिवसेनेनेही मनसेला जोरदार प्रत्युत्तर देत बाळासाहेबांचं पोस्टर लावत बाळासाहेब हे केवळ एकच होते, त्यांच्यासारखा दुसरा कोणीच नाही असं लिहीलं आहे.

लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरुन मनसे समाजातला जातीय आणि धार्मिक सलोखा बिघडवण्याचं काम करत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्ष करत आहेत. परंतू संदीप देशपांडेंनी हा आरोप फेटाळून लावला आहे. भोंग्याचा मुद्दा हा सामाजिक मुद्दा असून याचा धर्माशी काहीही संबंध नाही. परंतू ओमर अब्दुल्ला किंवा ओवैसी यांसारख्या माणसांना या मुद्द्यात टेन्शन निर्माण व्हावं असचं हवं आहे, म्हणूनच ते अशा प्रकारची वक्तव्य करत असल्याचं देशपांडे म्हणाले.

भोंग्याच्या मुद्द्यामुळे मनसे पक्षात नवीन चैतन्य निर्माण झालं असून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवीन उर्जा पहायला मिळत असल्याचंही देशपांडेंनी सांगितलं.

    follow whatsapp