उदय सामंत ठाकरेंच्या गळ्यातला ताईत झाला होता. राष्ट्रवादीच्या गळ्यातला ताईत असतानाही शिवसेनेत आल्यावर त्याने ही किमया साधली अशा शब्दात शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी उदय सामंत यांच्यावर टीका केली आहे. रत्नागिरीमध्ये भास्कर जाधव यांनी तुफान फटकेबाजी करत उदय सामंत यांना लक्ष्य केलं. आजपासून आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा सुरू झाला. आदित्य ठाकरेंच्या भाषणाच्या आधी भास्कर जाधव बोलत होते. उदय सामंत हा साप आहे तो विषच ओकणार असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.स
ADVERTISEMENT
“उद्धव ठाकरेंनी हा अस्वल कुठून निवडला काय माहित?”; हिंगोलीत भास्कर जाधव कुणाला अस्वल म्हणाले?
काय म्हटलं आहे भास्कर जाधव यांनी?
राजकारणासाठी उदय सामंतने आपल्या मुलीबाळींचाही उपयोग केला. याने सांगितलं (उदय सामंत) भास्कर जाधवांनी माझ्या लफड्याचे फोटो माझ्या मुलीच्या दप्तरात टाकले. मी असं का करेन? याची मुलगी मलाही मुलीसारखीच आहे. मात्र असा घाणेरडा आरोप करणंही उदय सामंतने सोडलं नाही. याला मी विचारलं की तू राष्ट्रवादी का सोडतोस? तर म्हणाला की तुम्ही, बशिर मुर्तूजा आणि कुमार शेटे यांनी मला पाडण्याचा कट आखला. भैरीच्या देवळात येऊन मी सांगायला तयार आहे.
‘लोकशाहीची चिंता वाटते’ असं भास्कर जाधव का म्हणाले?
ठाकरेंच्या गळ्यातला ताईत कसा झाला काय माहित?
उदय सामंत शिवसेनेत आल्यावर ठाकरेंच्या गळ्यातला ताईत कसा झाला काय माहित? सकाळ संध्याकाळ ठाकरेंच्या गळ्यात. याला उपनेता केला, याला पुण्याची जबाबदारी, याला साताऱ्याची जबाबदारी, याला कोल्हापूरची जबाबदारी, याला सिंधुदुर्गचं पालकमंत्रीपद आणि रत्नागिरीची जबाबदारी एवढं सगळं दिलं. २५ तारखेला हा तिकडे गेला. त्याच्या एक दिवस आधी हा उदय सामंत आदित्य ठाकरेंच्या सोबत बसून फ्रँकी खात होता. ती काय असते मला माहित नव्हतं, नंतर कळलं. फ्रँकी खाताना अर्धी फ्रँकी आदित्य ठाकरेंनी दिली होती. जे काही गेले होते त्यांच्यात जाऊ नको हेच सांगायचा प्रयत्न होता. मात्र दुसऱ्या दिवशी हा गुवाहाटीला दिला. आदित्यजी तुम्हाला फ्रँकी द्यायची होती तर माझ्या वैभव नाईकला द्यायची असंही भास्कर जाधव म्हणाले.
उदय सामंत साप, तो विषच ओकणार-भास्कर जाधव
आज भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणात उदय सामंत यांचा चौफेर समाचार घेतला. आदित्यजी मी तुम्हाला सांगतो सापाला दूध पाजून तो अमृत देतो का? तो विषच ओकणार आहे. हा सापच आहे असं म्हणत भास्कर जाधव यांनी टीकास्त्र सोडलं. मी आज या ठिकाणी भाषण करणार नव्हतो. पण रत्नागिरीतली जनता तुमची वाट बघते आहे असं राजन साळवींनी सांगितलं. त्यामुळे मी बोलतो आहे.
ADVERTISEMENT