Narayan Rane पांढऱ्या पायाचे, ते मंत्री झाल्यानेच कोकणावर आपत्ती कोसळली – गुलाबराव पाटील

मुंबई तक

• 04:15 PM • 26 Jul 2021

मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीतून राज्य सावरण्याचा प्रयत्न करत असताना एका बाजूला राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे. कोकण दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना ते पांढऱ्या पायाचे असल्याचं म्हटलं. शिवसेनेने या आरोपांना उत्तर देत, राणे हेच पांढऱ्या पायाचे असून ते मंत्री झाल्यामुळे कोकणावर आपत्ती कोसळली असं म्हटलंय. राज्याचे […]

Mumbaitak
follow google news

मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीतून राज्य सावरण्याचा प्रयत्न करत असताना एका बाजूला राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे. कोकण दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना ते पांढऱ्या पायाचे असल्याचं म्हटलं. शिवसेनेने या आरोपांना उत्तर देत, राणे हेच पांढऱ्या पायाचे असून ते मंत्री झाल्यामुळे कोकणावर आपत्ती कोसळली असं म्हटलंय.

हे वाचलं का?

राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी राणेंवर टीका केली आहे. “कोकणासह पश्चिम महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे. त्या आपत्तीतून सावरण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत असून, विरोधकांनी यामध्ये राजकारण करण्याची गरज नाही. मात्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे या आपत्तीतही राजकारण करत आहेत. नारायण राणे हे पांढऱ्या पायाचे आहेत. ते मंत्री झाल्यामुळेच कोकणावर ही आपत्ती कोसळली आहे”.

Chiplun Flood : मुख्यमंत्री पांढऱ्या पायाचे ! ते आले आणि वादळं आली…राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

जाणून घ्या काय म्हणाले होते नारायण राणे?

“राज्यावर येणाऱ्या संकटाला कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पायगुण. ते आल्यापासून वादळ काय, पाऊस काय सर्व चालूच आहे. कोरोना हे त्यांनी आपल्याला दिलेली देण आहे. मुख्यमंत्री आले आणि कोरोना घेऊन आले. त्यांचे पाय बघायला हवेत, पांढऱ्या पायाचे.”

शिवसेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी शहरातील लेवा भवन येथे अपंगांना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी राणेंना लक्ष्य करताना त्यांच्यावर घणाघाती टीका केली.

“आरोप-प्रत्यारोप व टीका करण्यासाठी नेहमीच राजकीय आखाडा हा रिकामा असतो. मात्र, आपत्तीमध्ये पीडितांना सहकार्य करणे, हेच लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असते. हे कर्तव्य राज्यकर्ते म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत इतर नेते देखील पार पाडत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या आपत्तीत राजकारण न करता काम करण्याची गरज असल्याचं”, मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

    follow whatsapp