आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणाला एकाच दिवसात तीन पातळ्यांवर यश

मुंबई तक

• 05:31 PM • 29 Oct 2022

उस्मानाबाद : शेतकऱ्यांना थकित पीक विमा आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी उस्मानाबादचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील  यांचे आमरण उपोषण सुरु असून आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. मात्र आजच्या एकाच दिवशी त्यांच्या उपोषणाला तीन पातळ्यांवर यश आले आहे. पण अद्यापही ते उपोषणावर ठाम आहेत. पहिले यश : विमा […]

Mumbaitak
follow google news

उस्मानाबाद : शेतकऱ्यांना थकित पीक विमा आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी उस्मानाबादचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील  यांचे आमरण उपोषण सुरु असून आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. मात्र आजच्या एकाच दिवशी त्यांच्या उपोषणाला तीन पातळ्यांवर यश आले आहे. पण अद्यापही ते उपोषणावर ठाम आहेत.

हे वाचलं का?

पहिले यश : विमा कंपनीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश

2020 सालातील पीक विमा नुकसान भरपाईची थकीत 373 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स या विमा कंपनीची मालमत्ता आणि संपत्ती जप्त करण्याचे आदेश उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिले आहेत. याची कार्यवाही करण्यासाठी त्यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना विनंती पत्र पाठविले आहे.

दुसरं यश : मुख्यमंत्र्यांकडून दखल, 282 कोटी रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव दाखल

प्रशासनासोबत शासनानेही आमदार कैलास पाटील यांच्या उपोषणाची सहाव्या दिवशी दखल घेतली आहे. उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी उपोषणस्थळी जाऊन कैलास पाटील यांची विचारपूस केली. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावला आणि दोघांचे बोलणे करुन दिले.

यावेळी 282 कोटी रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. 2020 व 2021 च्या विमाबाबत बैठक घेऊ, अतिवृष्टी आणि सततच्या पावसाच्या नुकसानीच्या भरपाईचा निधी लवकरात लवकर मंजुर करू असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्याचे कैलास पाटील यांनी सांगितले.

मात्र यावेळी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले असले तरी आपण आमरण उपोषणावर ठाम असल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास आहे, मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडे पैसे आल्यावर स्वतःहून आंदोलन मागे घेणार असल्याची भुमिका त्यांनी घेतली आहे.

तिसरं यश : १ लाख ८४ हजार ४१३ वाढीव शेतकरी ठरले पात्र :

कैलास पाटील यांनी त्यांच्या फेसबुकवरुन दिलेल्या माहितीनुसार १ लाख ८४ हजार ४१३ वाढीव शेतकरी पात्र ठरले आहेत. ते म्हणाले, उपोषणापूर्वी विमा कंपनीने १४ ऑक्टोबर रोजी १ लाख ६९ हजार ०८६ शेतकरी भरपाईस पात्र असल्याची यादी दिली. मात्र आपण ती मान्य न केल्याने पुन्हा बदलून १ लाख ७९ हजार ७३८ शेतकरी पात्र असल्याचे कळवण्यात आले. मात्र त्यानंतर उपोषणाचे हत्यार उपसताच पुन्हा ३ लाख ५३ हजार ४९९ शेतकऱ्यांची यादी देण्यात आली. आता १ लाख ८४ हजार ४१३ शेतकरी वाढले आहेत. हे आपल्या एकजुटीचे यश आहे.

    follow whatsapp