तिसरं मूल जन्माला घालणाऱ्यांना तुरुंगात पाठवा; कंगनाचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई तक

• 11:49 AM • 21 Apr 2021

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमी तिची मतं ट्विटरच्या माध्यमातून मांडत असते. अनेकदा तिच्या ट्विटमुळे वादंही निर्माण होतात. तर कंगनाने पुन्हा एक नवं ट्विट केलं आहे. तिच्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतातील वाढती लोकसंख्येवर कंगनाने भाष्य केलंय. भारताच्या वाढत्या लोकसंख्येला रोखण्यासाठी कठोर कायदा बनवावा. त्यासोबत तिसरं मुलं जन्माला घालणाऱ्यांना तुरूंगवासाची शिक्षा […]

Mumbaitak
follow google news

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमी तिची मतं ट्विटरच्या माध्यमातून मांडत असते. अनेकदा तिच्या ट्विटमुळे वादंही निर्माण होतात. तर कंगनाने पुन्हा एक नवं ट्विट केलं आहे. तिच्या या ट्विटमुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

भारतातील वाढती लोकसंख्येवर कंगनाने भाष्य केलंय. भारताच्या वाढत्या लोकसंख्येला रोखण्यासाठी कठोर कायदा बनवावा. त्यासोबत तिसरं मुलं जन्माला घालणाऱ्यांना तुरूंगवासाची शिक्षा द्यावी, असं वक्तव्य कंगणा राणावतने केलं आहे.

कंगना तिच्या ट्विटमध्ये म्हणते, लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी कठोर कायद्याची गरज आहे. हे खरे आहे की, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बळजबरीने लोकांची नसबंदी केली होती. आणि यामुळे त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. शिवाय पुढे त्यांची हत्याही करण्यात आली. पण आज भारतातील वाढती लोकसंख्या एक संकट आहेत. यासाठी तिसरं अपत्य जन्मास घालणा-यांवर दंड ठोठवायला हवा किंवा त्यांना तुरूंगवासाची शिक्षा देण्यात यावी.

विनामास्क स्टुडियोबाहेर दिसल्याने कंगना झाली ट्रोल

कंगनाचे हे ट्विट सोशल मीडियावर बरंच चर्चेत आलं आहे. कंगनाच्या या ट्विटवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक कंगनाच्या म्हणण्याला पाठिंबा देत आहेत तर काहींनी कंगना राणौतला ट्रोल केलं आहे. कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल म्हटलं तर लवकरच तिचा थलायवी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोबतच ती धाकड आणि तेजस या सिनेमांमध्ये झळकणार आहे.

    follow whatsapp