नवी दिल्ली: अभिनेता श्रेयस तळपदे कंगना रनौत दिग्दर्शित ‘इमर्जन्सी’मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. आज निर्मात्यांनी श्रेयसचा अटल बिहारी वाजपेयींच्या लुकचे अनावरण केले.
ADVERTISEMENT
याबद्दल बोलताना श्रेयस म्हणाला, “अटलजी हे सर्वात आदरणीय, बुद्धिमान, विद्वान, प्रभावशाली आणि भारतातील तसेच जगभरातील सर्वात प्रिय नेत्यांपैकी एक आहेत. त्यांना पडद्यावर साकारणे ही केवळ मोठी गोष्ट नाही तर मोठा सन्मान आणि निश्चितपणे एक मोठी जबाबदारी आहे. मला आशा आहे की मी सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करेन. मी ही भूमिका वठवण्याचा माझ्या परिने प्रयत्न करत आहे.”
श्रेयस तळपदेने केले कंगवा रणौतचे कौतुक
श्रेयसने आपल्या पोस्टमध्ये कंगनाचेही कौतुक केले आहे. ”कंगना ही देशाचील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. तसेच ती चांगली दिग्दर्शक देखील आहे. तिने इमर्जन्सी सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन करने खरचं अभिमानाची गोष्ट आहे. मी खूप आनंदी आहे, संपूर्ण टीमला शुभेच्छा.”
या चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबतच कंगना ‘इमर्जन्सी’ चित्रपटात भूमिका देखील साकारत आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका कंगना साकारणार आहे. दिग्गज कलाकार अनुपम खेर देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत. या चित्रपटात ते भारतरत्न पुरस्कार विजेते जयप्रकाश नारायण यांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत.
‘इमर्जन्सी’ कंगना रणौतचा दुसरा चित्रपट, म्हणाली…
कंगनाचा दिग्दर्शक म्हणून हा दुसरा चित्रपट आहे. यावर कंगना म्हणाली ”माझा पहिला चित्रपट मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी होता, त्यासाठी मला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. मला दुसरा चित्रपट दिग्दर्शीत करायचा मोह आवरत नव्हता परंतु मला हातातील काही कामं पूर्ण करायची होती. मला विश्वास आहे की माझा हा चित्रपट देखील प्रेक्षकांना आवडेल. मला आशा की प्रेक्षक अशा कलाकृतीच्या शोधात असतात त्यातून त्यांना काहीतरी प्रेरणा मिळेल.
मणिकर्णिका फिल्म्स प्रस्तुत ‘इमर्जन्सी’, ज्याचे लेखन आणि दिग्दर्शन कंगना रनौतने केले आहे. या चित्रपटाची निर्मिती रेणू पिट्टी आणि कंगना रनौत यांनी केली आहे. पटकथा आणि संवाद रितेश शाह यांचा आहे.
ADVERTISEMENT