दुर्दैवी ! वीजेचा धक्का लागून बहिण-भावाचा मृत्यू, बीडमधली घटना

मुंबई तक

• 10:05 AM • 13 Mar 2022

बीडच्या माजलगाव येथील टालेवाडी येथे छतावर चढलेल्या सख्ख्या भावा-बहिणीचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे. साक्षी बडे (वय १२) आणि सार्थक बडे (वय ८) अशी या भावा-बहिणीची नावं आहेत. बडे कुटुंबियांच्या घराच्या बाजूला असलेल्या डीपीवरुन अनेक वर्षापासून विजेचा करंट घरात पोहचत असल्याच्या घटना घडत होत्या. गावातील नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना […]

Mumbaitak
follow google news

बीडच्या माजलगाव येथील टालेवाडी येथे छतावर चढलेल्या सख्ख्या भावा-बहिणीचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे. साक्षी बडे (वय १२) आणि सार्थक बडे (वय ८) अशी या भावा-बहिणीची नावं आहेत.

हे वाचलं का?

बडे कुटुंबियांच्या घराच्या बाजूला असलेल्या डीपीवरुन अनेक वर्षापासून विजेचा करंट घरात पोहचत असल्याच्या घटना घडत होत्या. गावातील नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊनही याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आलं नाही असा गावकऱ्यांचा आरोप आहे.

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्थक हा खेळत असताना छतावर चढला असता त्याला विजेचा शॉक लागल्याचं कळतंय. सार्थकला पाहण्यासाठी गेलेल्या साक्षीलाही करंट लागल्याचं कळतंय. या दोन्ही भावंडांचा विजेचा धक्का लागल्यानंतर जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात सध्या शोकाकुल वातावरण आहे.

वर्धा : सात विद्यार्थ्यांनी जीव गमावलेल्या ‘त्या’ ठिकाणीच विचित्र अपघात; दोघे ठार, तीन गंभीर

    follow whatsapp