काळीज पिळवटून टाकणारी घटना, पाळण्याने घेतला चिमुकल्या बहीण-भावाचा जीव

मुंबई तक

• 02:00 AM • 24 Mar 2022

यवतमाळ: पाळणा हा प्रत्येक बाळाला आवडतो. चिमुकली लेकरं पाळण्यात टाकताच झोपी जातात. मात्र हाच पाळणा दोन चिमुकल्यांच्या जीवावर उठला असून आज सहा महिन्यांचा तेजस व नऊ वर्षाची प्राची या जगाला अखेरचा निरोप देऊन काळाच्या पडद्याआड गेली आहेत. विजय घुक्से हे शेतकरी पुसद येथील महावीर नगर येथे राहतात. विजय यांना 4 अपत्य आहेत. मात्र, आज घुक्से […]

Mumbaitak
follow google news

यवतमाळ: पाळणा हा प्रत्येक बाळाला आवडतो. चिमुकली लेकरं पाळण्यात टाकताच झोपी जातात. मात्र हाच पाळणा दोन चिमुकल्यांच्या जीवावर उठला असून आज सहा महिन्यांचा तेजस व नऊ वर्षाची प्राची या जगाला अखेरचा निरोप देऊन काळाच्या पडद्याआड गेली आहेत.

हे वाचलं का?

विजय घुक्से हे शेतकरी पुसद येथील महावीर नगर येथे राहतात. विजय यांना 4 अपत्य आहेत. मात्र, आज घुक्से परिवार शोकाकूल आहेत ते एका पाळण्यामुळे. घुक्से यांचे लक्ष्मीनगर येथे शेत आहे. याच शेतात प्राचीचे वडील विजय घूक्से हे गाजर काढण्याचे काम करीत होते. तर आई सारिका ही सहा महिन्याच्या तेजसला साडीने बांधलेल्या पाळण्याने झोका देत होती.

सकाळी 11 वाजता प्राची ही शाळा आटोपून शेतात आली. भूक लागल्याने आईला जेवण देण्यास सांगितलं. त्यावेळी आईने तेजसला झोका दे असे म्हणून आई जेवण आणण्यासाठी घरात गेली. तितक्यात सिमेंटचा निकृष्ट दर्जाचा खांब अचानक तुटून झोका घालणाऱ्या प्राचीच्या डोक्यावर आदळला. त्यामुळे प्राची जागीच बेशुद्ध झाली. तर झोपाळ्यात असणारा तेजस हा जोरात बाजूला फेकला गेला.

दरम्यान, आई सारिका ही पाणी घेऊन बाहेर आल्यावर संपूर्ण प्रकार बघितला आणि आरडाओरड केली. त्यानंतर वडील विजय यांनी दोन्ही चिमुकल्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारार्थ नेले. मात्र डॉक्टरांनी प्राचीला मृत घोषित केले. तर तेजसला नांदेड येथे रेफर करण्यात आले. मात्र, वाटेतच त्याचीही प्राणज्योत मालवली.

दरम्यान, या घटनेने घुक्से कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. अगदी क्षुल्लक घटनेतून पोटच्या दोन मुलांना गमवावं लागल्याने संपूर्ण कुटुंब अद्यापही या धक्क्यातून सावरु शकलेलं नाही.

मंगळवेढा: दुकानातून आणलेल्या खाऊमुळे दोन सख्ख्या बहिणींनी गमावला जीव

आज हे दोघेही चिमुकले आपल्यात नाहीत. मात्र, या घटनेतून निकृष्ट दर्जाच्या सिमेंट खांबामुळे जीव सुद्धा जाऊ शकतो त्यामुळे अशा निकृष्ट खांबांचा वापर थांबविण्याची गरज आहे जेणे करून पुन्हा आपल्यातील प्राची व तेजस सारखे चिमुकले जीव गमवणार नाहीत.

    follow whatsapp