ADVERTISEMENT
कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉनचा ‘शेहजादा’ हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय.
कार्तिक-क्रितीचे चाहते या चित्रपटाची आवर्जून वाट पाहत आहेत. त्याची जबरदस्त चर्चा सुरू आहे.
कार्तिकचे चाहते त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करतात. देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी तो सिद्धिविनायक मंदिरात पोहोचलेला.
मंदिरात दर्शन घेतल्यानंतर कार्तिक जेव्हा आई-वडिलांसोबत बाहेर पडला तेव्हा त्याला चाहत्यांनी घेरलं होतं.
यानंतर कार्तिकची गाडी मुंबई वाहतूक पोलिसांनी अडवली.
कार्तिकच्या ड्रायव्हरने ‘नो पार्किंग’ झोनमध्ये कार पार्क केली होती, ज्यासाठी त्याच्यावर दंड ठोठावण्यात आला.
पोलिसांनी कार्तिकच्या नावाने चालान जारी केले, नंतर त्याला जाण्याची परवानगी देण्यात आली.
काळ्या रंगाच्या आलिशान कारमधून कार्तिक आपल्या आई-वडिलांसोबत मंदिरात आला होता.
ADVERTISEMENT