ADVERTISEMENT
दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतात.
ट्वीटरवर काही चांगलं घडलं असेल तर व्हिडीओ ट्वीट करत तरूणाईला ते प्रोत्साहन देताना दिसतात.
नुकताच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओतून पंजाबी गायक स्नेहदीप सिंगचं त्यांनी कौतुक केलं आहे.
महिंद्रानी स्नेहदीपचं कौतुक करण्यामागचं कारण विशेष आहे.
स्नेहदीप सिंगने रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या ब्रम्हास्त्र चित्रपटातील केसरीया हे गाणं चक्क विविध भाषेत गायलं आहे.
मल्याळम, तामिळ, कन्नड, तेलुगू आणि हिंदी अशा पाच भाषांमध्ये स्नेहदीप केसरीया हे गाणे गायला.
आनंद महिंद्रानी त्याचा व्हिडीओ ट्वीट करत लिहिलं, ‘एक पंजाबी मुलगा मल्याळम, तामिळ, कन्नड, तेलगू आणि हिंदीमध्ये केसरिया गातो.’
‘मला माहित नाही की मला दक्षिणी भाषा किती चांगल्या प्रकारे माहित नाही पण एकायला छान वाटते.’
‘तसंच अधिक भाषा शिकणे ही एक सुंदर गोष्ट आहे.’ असं आनंद महिंद्रानी लिहलं आहे.
ADVERTISEMENT