सोलापूर : डॉक्टरचं अपहरण करुन १ कोटींची खंडणी मागणाऱ्या सात आरोपींना अटक

मुंबई तक

• 04:42 PM • 30 Sep 2021

उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा भागात दवाखाना आणि पेट्रोलपंप चालवणाऱ्या डॉ. अनिल कुलकर्णी यांचं अपहरण करुन १ कोटींची खंडणी मागणाऱ्या ७ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अपहरणादरम्यान आरोपींनी डॉ. कुलकर्णी यांच्याकडे असलेली ५ लाख ८८ हजार ४२० रुपयांची रक्कमही लुटली. उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे प्रॅक्टिस करणारे नामांकित डॉ.अनिल कुलकर्णी हे 21 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 […]

Mumbaitak
follow google news

उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा भागात दवाखाना आणि पेट्रोलपंप चालवणाऱ्या डॉ. अनिल कुलकर्णी यांचं अपहरण करुन १ कोटींची खंडणी मागणाऱ्या ७ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अपहरणादरम्यान आरोपींनी डॉ. कुलकर्णी यांच्याकडे असलेली ५ लाख ८८ हजार ४२० रुपयांची रक्कमही लुटली.

हे वाचलं का?

उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे प्रॅक्टिस करणारे नामांकित डॉ.अनिल कुलकर्णी हे 21 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजता आपल्या वडाळा येथील पेट्रोल पंपाची कॅश घेऊन आपल्या चारचाकी गाडीने घराकडे चालले होते. यावेळी बीबी दारफळ येथे त्यांच्या गाडीला इनोव्हा कार आडवी लावून आरोपींनी गावठी रिव्हॉल्वर लावून धाक दाखवत त्यांना मारहाण केली. आरोपींनी डॉ.कुलकर्णी जवळील 5 लाख 88 हजार 420 रुपये काढून घेऊन त्यांच्याकडे 1 कोटींची खंडणी मागितली.

यादरम्यान आरोपींनी डॉ. कुलकर्णी यांना मोहोळ , पंढरपूर , टेंभुर्णी , इंदापूर ,बारामती , जेजुरी-सासवड मार्गे नेऊन वारजे-मळेवाडी पुणे येथे ढकलून दिलं आणि निघून गेले. या प्रकरणाचा तपास करत असताना सोलापूर पोलिसांच्या LCB पथकाने तपासाची चक्र फिरवली. चौकशीदरम्यान वडगाव सिंहगडरोड, पानमळा भागातल्या आरोपींनी हा गुन्हा गेल्याची माहिती मिळाली. गुप्त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर पोलिसांनी पुण्यातून ५ आरोपींना ताब्यात घेतलं असता हा गुन्हा उघडकीस आला.

    follow whatsapp