बॉलिवूडचा सर्वात प्रतिष्ठेचा मानला जाणारा फिल्मफेअर या अवॉर्डची घोषणा करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तापसी पन्नूने पटकावला आहे. थप्पड या सिनेमासाठी तापसीना हा पुरस्कार मिळाला आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला मात्र यावेळी कोणताही पुरस्कार मिळाला नाही. परंतु तिने शक्कल लढवत फिल्मफेअर अवॉर्ड घरी आणला आहे.
ADVERTISEMENT
फिल्मफेअर अवॉर्ड न मिळाल्याने सोनाक्षी काहीशी नाराज झाली. मात्र तरीही तिने हार न मानता फिल्मफेअर घरी आणलाय. याचा व्हिडीयो सोनाक्षीने सोशल मीडीयावर शेअर केलाय. तिचा हा व्हिडीयो सध्या जोरदार चर्चेत आहे. अनेकांनी तिच्या व्हिडीयोवर गमतीशीर कमेंट्स देखील केल्या आहे.
तर सोनाक्षी इन्स्टाग्रामच्या या व्हिडीयोमध्ये फिल्मफेअर अवॉर्डचा स्केच बनवताना दिसतेय. तर या व्हिडीयोच्या बॅकग्राऊंडला किशोर कुमार यांचं ‘मेरे सपनों की रानी’ हे गाणं वाजतंय. खूप मेहनत घेऊन ती फिल्मेअरच्या अवॉर्डचं स्केच पूर्ण करते. शिवाय या व्हिडीयोला कॅप्शन देताना ती म्हणते, “मी फिल्मफेअरपर्यंत नाही पोहचू शकले मात्र फिल्मफेअर माझ्यापर्यंत पोहोचला.”
Filmfare Awards 2021- तापसी पन्नू सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून ओम राऊतची निवड
66 व्या फिल्मफेअर अवार्ड 2021ची घोषणा करण्यात आलीये. सर्वोत्कृष्ट सिनेमा म्हणून थप्पडची वर्णी लागली आहे. तर तर दिवंगत अभिनेता इरफान खानला सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून मराठमोळ्या ओम राऊतची निवड करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT