ST Strike : एसटीच्या खासगीकरणाबद्दल गुलाबराव पाटलांचं मोठं विधान; कर्मचाऱ्यांना केलं आवाहन

मुंबई तक

• 02:51 AM • 20 Nov 2021

–मनीष जोग, जळगाव एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दिवाळीच्या तोंडावर सुरू केलेला संप अजूनही सुरूच आहे. एसटी कर्मचारी संपावर गेल्याने राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेली लालपरी ठप्प झाली आहे. सरकार आणि एसटी कर्मचारी संघटना यांच्यातील कोंडी कायम असल्याचं चित्र असून, आता सरकार एसटी महामंडळाचं खासगीकरण करणार असल्याचीही चर्चा जोर धरू लागली आहे. यातच […]

Mumbaitak
follow google news

मनीष जोग, जळगाव

हे वाचलं का?

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दिवाळीच्या तोंडावर सुरू केलेला संप अजूनही सुरूच आहे. एसटी कर्मचारी संपावर गेल्याने राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा असलेली लालपरी ठप्प झाली आहे. सरकार आणि एसटी कर्मचारी संघटना यांच्यातील कोंडी कायम असल्याचं चित्र असून, आता सरकार एसटी महामंडळाचं खासगीकरण करणार असल्याचीही चर्चा जोर धरू लागली आहे. यातच राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एसटी महामंडळाच्या खासगीकरणाबद्दल मोठं विधान केलं आहे.

गुलाबराव पाटील यांनी ‘मुंबई Tak’च्या प्रतिनिधीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचं आवाहन केलं. त्याचबरोबर कोंडी कायम राहिली, तर एसटी महामंडळाचं खासगीकरण करण्यापासून सरकारला कुणीही रोखू शकत नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

Explainer: एसटी महामंडळाचे विलीनीकरण म्हणजे काय? काय आहेत मागण्या?

गुलाबराब पाटील काय म्हणाले?

“दिवाळीच्या सणामध्ये या लोकांनी आंदोलन करणं, हे फारच चुकीचं होतं. कारण त्यावेळी दिवाळीसारखा सण होता. त्यांचा तो अधिकार आहे, मात्र, ते करणं चुकीचं होतं. मी एसटी कर्मचारी बांधवांना हीच विनंती करणार आहे की, दोन वर्ष कोरोनाच्या काळात याच सरकारने तुम्हाला घरपोच पगार दिलेला आहे. थोडीशी माणुसकी ठेवून याचा विचार केला पाहिजे.

“12,000 कोटी तूट असलेलं हे महामंडळ आहे. ते नफ्यात नाही. ट्रान्सस्पोर्टचा (वाहतूक) धंदा हा असाच असतो की, तो तोट्यात चालवावा लागतो. त्यामुळे मला असं वाटतं की एसटी कर्मचाऱ्यांनी या गोष्टीचा विचार करून कामावर यावं, अन्यथा सरकारला खासगीकरणाकडे जाण्यापासून कुणी रोखू शकत नाही, असं चित्र आज झालेलं आहे”, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी, वाहतूक नियंत्रकाच्या डोक्यातच घातला दगड

‘लाश वही है मगर कफन बदल गया है’

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत सरकारवर टीका करणाऱ्या शेतकरी सदाभाऊ खोत यांच्यावरही गुलाबराव पाटील यांनी टीका केली. “भाजपाचे नेते सदाभाऊ खोत हे शेतकरी नेते होते. मात्र आता त्यांची खाल बदललेली आहे. ‘लाश वही है मगर कफन बदल गया है..!’ त्यामुळे ते कफनाच्या हिशोबाने बोलत आहेत. सदाभाऊ खोत हे चंगू झालेले असून, त्यांनी चांगलं बोललं पाहिजे असं माझं मत आहे”, असं म्हणत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी खोत यांना टोला लगावला.

    follow whatsapp