संभाजीराजे – प्रकाश आंबेडकर एकत्र आले तर पेशवाईला फटका, नाना पटोलेंची भाजपवर बोचरी टीका

मुंबई तक

• 08:23 AM • 12 Jun 2021

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत असताना एकीकडे खासदार संभाजीराजे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे. गेल्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना चांगलाच फटका बसला होता. परंतू आता प्रकाश आंबेडकर आणि संभाजीराजे एकत्र आले तर पेशवाईला फटका बसेल अशी बोचरी टीका […]

Mumbaitak
follow google news

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत असताना एकीकडे खासदार संभाजीराजे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे. गेल्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना चांगलाच फटका बसला होता. परंतू आता प्रकाश आंबेडकर आणि संभाजीराजे एकत्र आले तर पेशवाईला फटका बसेल अशी बोचरी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

हे वाचलं का?

नाना पटोले सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. अमरावतीत पत्रकारांशी बोलत असताना पटोलेंनी केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर चांगलीच टीका केली. मराठा आरक्षणावरुन आंदोलनाची हाक दिलेल्या संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीबद्दल विचारलं असता पटोलेंनी, येत्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर आणि संभाजीराजे एकत्र आले तर पेशवाईला याचा फटका बसेल, शिवशाहीला नाही असं उत्तर दिलं.

कोरोनानंतर राज्यात अनेक रुग्णांना म्युकरमायकोसिस या आजाराने ग्रासलं आहे. राज्यात आज ब्लॅक फंगसचे ५० हजारांच्या घरात रुग्ण असताना केंद्र सरकार फक्त ४-५ हजार इंजेक्शन देतं. इंजेक्शनची काळाबाजारी केली जात आहे ज्यामुळे अनेकांना आपले जीव तर अनेकांना आपले अवयव गमवून बसावे लागत असल्याची टीका पटोलेंनी केली. केंद्र सरकारला सामान्य माणसाच्या जिवाचं काहीच घेणंदेणं नसून ते सामान्यांच्या जिवाशी खेळ करत असल्याचंही पटोले म्हणाले.

    follow whatsapp