नवरा आणि बायकोमध्ये होणारे वाद काही नवीन गोष्ट नाही. सोलापूरमध्ये पती-पत्नीच्या वादातून पतीने चक्क आपलं राहतं घर जाळून टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घर पेटवून दिल्यामुळे शेजारील घरांचंही नुकसान झालेलं असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
ADVERTISEMENT
सोलापुरातील गोदुताई विडी घरकुल रोडवरील माळी नगर इथं ही घटना घडली. श्याम भंडारी असं घर पेटवणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे. श्याम आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत वाद होत होते. चार दिवसांपासून सुरु असलेल्या या वादानंतर श्याम भंडारीने मी घराला आग लावीन अशी धमकी दिली.
इतकच नव्हे तर श्यामने सोमवारी रात्री आपल्या शेजाऱ्यांना मी घराला आग लावणार आहे, तुम्ही अग्नीशमन दलाला बोलवून घ्या असं सांगितलं. श्यामच्या या धमकीमुळे त्याचे शेजारीही चांगलेच चिंतेत सापडले होते. आज सकाळी पती आणि मुलं माहेर निघून गेली. त्यानंतर श्याम भंडारी याने घराला आग लावून बाहेर निघून गेला. शेजाऱ्यांनी तातडीने याची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. शेजाऱ्यांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली.
श्यामच्या या कृत्यामुळे शेजारील घरांचं नुकसान झालं आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरीही पोलिसांनी या घटनेनंतर श्याम भंडारीविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ADVERTISEMENT