ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्यावर कठोर कारवाई केली जावी-सुरेखा पुणेकर

मुंबई तक

• 06:43 AM • 04 Feb 2022

स्वाती चिखलीकर, प्रतिनिधी, सांगली बंडातात्या कराडकर यांनी महिलांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांप्रकरणी त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी सुरेखा पुणेकर यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. त्यांनी केलेलं वक्तव्य योग्य नाही त्यांच्यावर याबाबत कठोर कारवाई केली जावी अशी मागणी सुरेखा पुणेकर […]

Mumbaitak
follow google news

स्वाती चिखलीकर, प्रतिनिधी, सांगली

हे वाचलं का?

बंडातात्या कराडकर यांनी महिलांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांप्रकरणी त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जावी अशी मागणी सुरेखा पुणेकर यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. त्यांनी केलेलं वक्तव्य योग्य नाही त्यांच्यावर याबाबत कठोर कारवाई केली जावी अशी मागणी सुरेखा पुणेकर यांनी केली आहे.

काय म्हणाल्या आहेत सुरेखा पुणेकर?

बंडातात्या कराडकर यांनी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मी त्यांच्या वक्तव्याचा निषेध करते. महिला आयोग आणि शासनाला माझी विनंती आहे की बंडातात्या कराडकर यांच्यावर जास्तीत जास्त कडक कारवाई केली जावी.

ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करत असताना पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करत सगळ्याच नेत्यांची मुलं दारू पितात. माझ्याकडे त्यांचे पुरावे आहेत असं बंडातात्या कराडकर म्हणाले होते. आता या प्रकरणी माझं चुकलं म्हणत त्यांनी माफी मागितली आहे.

काय म्हणाले आहेत बंडातात्या कराडकर?

‘ज्यांनी माझ्यावर आक्षेप घेतला आहे त्यांच्याशी मी प्रत्यक्ष फोनवर बोललो आहे. माझं चुकलं असेल तर मी क्षमा मागण्यास तयार आहोत. आपल्या तोंडून काही चुकीचं असेल तर क्षमा मागण्यात कमीपणा नाही’ असं बंडातात्या कराडकर यांनी म्हटलं आहे.

पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे या दोघींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांनी उल्लेख केल्याने पंकजा मुंडे यांचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी बंडातात्या कराडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर माझं चुकलं म्हणत बंडातात्यांनी विषय संपवा असं म्हटलं आहे.

‘चूक झाली म्हणत…’ सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडेंबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी बंडातात्यांची माफी

नेमकं काय म्हणाले होते बंडातात्या?

‘सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पिऊन नाचतात. सुप्रियाताई दाऊ पिऊन रस्त्यावर पडल्याचे फोटो ढिगाने मिळतील तुम्हाला. खासदार व्हायच्या आधीचे त्यांचे फोटो बघा. राजकारणात यायच्या आधी त्या दारू पिऊन पडत होत्या. सुप्रिया सुळेंनी सांगावं की बंडातात्या खोटं बोलतोय. सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे या दारू पिऊन नाच करतात. पतंगराव कदमांचा एक मुलगा कसा मेला? दारूच्या नादातून कसा गेला जरा शोधा. माझा पत्रकारांना प्रश्न आहे की कुठल्या पुढाऱ्याचा मुलगा पित नाही असं तुम्हाला माहित असेल तर मला सांगा. कऱ्हाडचे बाळासाहेब आमदार त्यांचा मुलगा दारू पितो की नाही? सगळ्यांची नावं सांगू का? मी सांगू शकतो’ असं वक्तव्य बंडातात्या कराडकर यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांच्या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध होतो आहे.

    follow whatsapp