Viral : '11 दिवस शाळेत तर येणारच नाही, पण गणपतीत...', विद्यार्थ्याचा सुट्टीचा अर्ज पाहून पोट धरून हसाल

मुंबई तक

14 Sep 2024 (अपडेटेड: 14 Sep 2024, 02:05 PM)

Funny Leave Application Viral: शाळेतून सुट्टी घेण्यासाठी विद्यार्थी अनेकदा भन्नाट बहाणे करत असतात. विद्यार्थ्यांची कारणं ऐकून शिक्षकही पोट धरून हसल्याशिवाय राहत नाहीत. सोशल मीडियावरही अशाच प्रकारची एक मजेशीर लीव्ह अॅप्लिकेशन व्हायरल झाली आहे.

Student School Leave Application Viral

Student School Leave Application Viral

follow google news

बातम्या हायलाइट

point

शाळेतील विद्यार्थ्याची मजेशीर पोस्ट होतेय व्हायरल

point

विद्यार्थ्याचा सुट्टीचा अर्ज पाहून शाळेतील शिक्षकही चक्रावले

point

व्हायरल झालेला सुट्टीचा अर्ज वाचल्यानंतर तुम्हीही पोट धरून हसाल

Funny Leave Application Viral: शाळेतून सुट्टी घेण्यासाठी विद्यार्थी अनेकदा भन्नाट बहाणे करत असतात. विद्यार्थ्यांची कारणं ऐकून शिक्षकही पोट धरून हसल्याशिवाय राहत नाहीत. सोशल मीडियावरही अशाच प्रकारची एक मजेशीर लीव्ह अॅप्लिकेशन व्हायरल झाली आहे. विद्यार्थ्याने या अर्जात लिहिलेला मजकूर वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही. एका विद्यार्थ्याने गणेश चतुर्थीचा बहाणा सांगून शाळेत सुट्टीची मागणी केली आहे. एव्हढच नाही तर, तर या विद्यार्थ्याने एक दिवसाची एक्स्ट्रा सुट्टीही मागितली आहे. विद्यार्थ्याने केलेला गमतीशीर बहाणा वाचून नेटकऱ्यांचाही हशा पिकला आहे. 

हे वाचलं का?

गणेश चर्तुर्थीला 11 दिवसांची सुट्टी आणि एक दिवस...

रामदल गणेश मंडळ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर विद्यार्थ्याची लिव्ह अॅप्लिकेशन शेअर करण्यात आली आहे. विद्यार्थ्याने या अर्जाद्वारे गणपती उत्सवानिमित्त 11 दिवसांची सुट्टी मागितली आहे. गणेशोत्सव दहा दिवसांचा असतो. अकराव्या दिवशी बाप्पाचं विसर्जन केलं जातं. विद्यार्थ्याने सुट्टीच्या अर्जात लिहिलं आहे की,  मी (विद्यार्थी) दिवस शाळेत येऊ शकणार नाही. कारण गणेश चतुर्थी आहे. त्यानंतर एका दिवसाची विश्रांती घेईल. विषय संपला..असं विद्यार्थ्याने या अर्जात शेवटी लिहिलं आहे. या फनी अॅप्लिकेशनला आतापर्यंत 72 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. 

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: खूशखबर! लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार तिसऱ्या हफ्त्याचे पैसे, फक्त...

इथे पाहा व्हायरल झालेल्या लिव्ह अॅप्लिकेशनची मजेशीर


नेटकऱ्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

सुट्टीचा अर्ज वाचल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, सरळ गोष्ट आहे...खोटेपणा नाही. दुसऱ्या यूजरने लिहिलं, याच कारणामुळे शाळेतील व्यवस्थापनाकडून नवरात्रीत परिक्षा ठेवण्यात आल्या आहेत. एका अन्य यूजरने म्हटलं, ही खूप चांगली कल्पना आहे. मी सुद्धा शाळेत अशाप्रकारचा प्रयत्न करेन. अनेक नेटकऱ्यांनी स्माईली इमोजी सेंड करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हे ही वाचा >> Today Gold Rate: बाईई! काय हा प्रकार? सोनं महागलं; खिशाला लागणार कात्री, 24 कॅरेटचा भाव एव्हढा...

सोशल मीडियावर शाळेतील विद्यार्थ्याचे फनी व्हिडीओ नेहमीच व्हायरल होत असतात. शाळेत जायचा कंटाळा आला की, विद्यार्थी काहीतरी अनोखी आयडीया करतात आणि शिक्षकांनाही चक्रावून टाकता. अशाचप्रकारे या विद्यार्थ्यानेही सुट्टीचा आगळावेगळा अर्ज करुन शाळेतील शिक्षकांच्या भुवया उंचावून टाकल्या आहेत. या विद्यार्थ्याचा सुट्टीचा अर्ज वाचल्यानंतर इंटरनेटवर गमतीशीरी प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे. 

    follow whatsapp