ADVERTISEMENT
शशी थरूर यांची सुनंदा पुष्कर आत्महत्या प्रकरणातील आरोपातून मुक्तता करण्यात आली.
न्यायालयाच्या निकालानंतर या प्रकरणाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
सुनंदा पुष्कर यांचा जन्म २७ जून १९६४ रोजी काश्मिरी पंडित कुटुंबात झाला होता.
सुनंदा पुष्कर यांनी तीन लग्न केली. पहिल्या पतीला घटस्फोट दिला, तर दुसऱ्याचं निधन झालं होतं.
दुबईला गेल्यानंतर त्यांनी १९९१ मध्ये सुजित मेनन यांच्याशी लग्न केलं होतं. त्यांचा मृत्यू झाला.
पुढे दुबईत ऑक्टोबर २००९ मध्ये सुनंदा आणि शशी थरूर यांची एका पार्टीत ओळख झाली.
ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि २०१० मध्ये दोघंही विवाहबंधनात अडकले.
थरुर यांच्या केरळातील गावी मल्ल्याळी पद्धतीने ते लग्नबद्ध झाले. हा दोघांचाही तिसरा विवाह होता.
१७ जानेवारी २०१४ रोजी दिल्लीतील लीला पॅलेस हॉटेलच्या रुममध्ये त्या मृतावस्थेत आढळून आल्या होत्या.
पाकिस्तानी पत्रकार मेहर तरारसोबत ट्विटरवर वाद झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुनंदा पुष्कर या मृतावस्थेत आढळून आल्या होत्या.
ADVERTISEMENT