राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना अर्वाच्य शब्द वापरला होत. त्यानंतर अब्दुल सत्तारांविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अब्दुल सत्तारांच्या राजीनामा घेण्याच्या मागणीसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचीही भेट घेतली. या विधानाला २४ तास लोटल्यानंतर सुप्रिया सुळेंनी पहिली प्रतिक्रिया दिलीये.
ADVERTISEMENT
अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त विधानावर सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरून निवेदन प्रसिद्ध केलंय. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले,याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात.”
अब्दुल सत्तारांचं वादग्रस्त विधान : लोकांच्या प्रतिक्रियांची सुप्रिया सुळेंकडून नोंद
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, “परंतु सगळेच तारतम्य पाळतात असे नाही. जरी त्यांनी काही तारतम्य पाळले नाही तरी ज्या पद्धतीने विविध संस्था, व्यक्ती, माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया आल्या, संवेदना व्यक्त केल्या गेल्या ही बाब आश्वासक आहे. तिची नोंद घेणे गरजेचे आहे”, असं मत सुप्रिया सुळे यांनी मांडलं.
अब्दुल सत्तारांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना दिलं पत्र
सुप्रिया सुळेंनी अब्दुल सत्तारांना दिली महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण
“मला आवर्जून असे सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया. याप्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा ‘सुसंस्कृतच महाराष्ट्र’ आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद-जय महाराष्ट्र!”, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.
अब्दुल सत्तार ‘५० खोके’ अन् सुप्रिया सुळेंबद्दल काय म्हणाले होते?
‘सुप्रिया सुळे म्हणताहेत की, ५० खोके तुम्हालाही मिळालेत का? त्यावर तुम्ही (अब्दुल सत्तार) त्यांना म्हणाले की तुम्हाला द्यायचेत का? तर त्यावर त्या (सुप्रिया सुळे) म्हणाल्या की, तुमच्याकडे आले असतील म्हणूनच तुम्ही त्यांना ऑफर करताहेत… काय सांगाल?’, असा प्रश्न ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने अब्दुल सत्तार यांना विचारला. त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले, ‘इतकी भिकार#$ झाली असेल, सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ’, असं उत्तर सत्तारांनी दिलं.
ADVERTISEMENT