Corona लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्यास संमती मिळाली आहे. मात्र राज्यातील अनेक ठिकाणी नागरिकांना नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि इतर कारणांसाठी रेल्वे प्रवास करावा लागतो. सध्या मुंबई लोकल प्रवास वगळता रेल्वे प्रवासासाठी संमती नाही. ही संमती देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे.
ADVERTISEMENT
15 ऑगस्टपासून महाराष्ट्रातले कोरोनाचे निर्बंध हे शिथील करण्यात आले आहेत. तसंच कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना 14 दिवस पूर्ण झाले असतील तर त्यांना मुंबई लोकलने प्रवासाचीही संमती देण्यात आली आहे. त्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पडताळणी करून पास दिला जातो आहे. मात्र रेल्वे प्रवासासाठी म्हणजेच राज्यांमधल्या इतर शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी अशी संमती देण्यात आलेली नाही. ती संमती देण्यात यावी अशी महत्त्वाची मागणी सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे. सकारात्मक विचार करावा असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
15 ऑगस्टपासून मुंबई लोकल ही लसीचे दोन डोस घेतलेल्यांना सुरू करण्यात आली आहे. 8 ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी सोशल मीडियाद्वारे संवाद साधला होता. त्यामध्ये त्यांनी हा निर्णय जाहीर केला.
जाणून घ्या लोकल प्रवासासाठी नेमके काय नियम :
लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना 15 ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार
दुसऱ्या डोसनंतर 14 दिवसांचा कालावधी अनिवार्य
स्मार्टफोनवर रेल्वे पास डाऊनलोड करण्याची सोय
स्मार्टपोन नसल्यास प्रभाग कार्यालये, उपनगरीय रेल्वे स्थानकांवर फोटो पासेस
पासवरील क्यूआर कोडमुळे अधिकृतता कळणार
ADVERTISEMENT