सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट; जावयाला संभाळण्यासाठी मी गुजराती समाजाला 2 टक्के आरक्षण दिलं

मुंबई तक

• 05:24 AM • 19 Sep 2022

सोलापूर: देशाचे माजी गृहमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्याची आता चर्चा सर्वत्र चर्चा आहे. ”मी मुख्यमंत्री असताना गुजराती समाजाला 2 टक्के आरक्षण दिले होते. तेवढे एक चांगले काम मी केले होते.” असे वक्त सुशीलकुमारांनी सोलापुरातील एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान केले. सुशीलकुमार शिंदे नेमकं काय म्हणाले? पुरस्कार सोहळ्यादरम्यान सुशीलकुमार म्हणाले […]

Mumbaitak
follow google news

सोलापूर: देशाचे माजी गृहमंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एक वक्तव्य केलं आहे. त्याची आता चर्चा सर्वत्र चर्चा आहे. ”मी मुख्यमंत्री असताना गुजराती समाजाला 2 टक्के आरक्षण दिले होते. तेवढे एक चांगले काम मी केले होते.” असे वक्त सुशीलकुमारांनी सोलापुरातील एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान केले.

हे वाचलं का?

सुशीलकुमार शिंदे नेमकं काय म्हणाले?

पुरस्कार सोहळ्यादरम्यान सुशीलकुमार म्हणाले ” मी मुख्यमंत्री असताना गुजराती समाजाला २ टक्के आरक्षण दिले होते. लोक आता विसरून गेले की सुशीलकुमारांनी गुजराती समाजाला आरक्षण दिले होते, चांगले काम केले होते.”

गुजाराती समाजाला आरक्षण का दिले याचं कारणही सुशीलकुमार शिंदेंनी सांगितले आहेत. ”गुजराती समाजाला आरक्षण दिले कारण माझा जावई गुजराती आहे. त्यामुळे मला आरक्षण द्यावं लागले. जावयाला सांभाळायचे म्हंटल्यावर हे सगळे करावे लागते. हे सगळे केल्यामुळे मी तिथे पुन्हा निवडून आलो. ही साधी गोष्ट नव्हती.” असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले आहेत.

मला कसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरुन काढले…सुशीलकुमार शिंदे

पुढे सुशीलकुमार म्हणाले ”इथं बसलेल्या लोकांना माहिती आहे आतले कारस्थान. मला कसे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरुन काढले आणि राज्यपाल म्हणून आंध्रप्रदेशला पाठवले, पण ठीक आहे. मी त्यानंतर दिल्लीच्या मंत्रीमंडळात गेलो. मात्र त्यांना जो पराभव पत्करावा लागला तो अजूनपर्यंत आहे. तरीही आपण प्रामाणिकपणे आपले काम करत राहिले पाहिजे असे मला वाटते.”

सुशीलकुमार शिंदे यांची राजकीय कारकीर्द

1971 मध्ये सुशीलकुमार शिंदे काँग्रेस पक्षाचे सदस्य झाले. त्यांनी 1974, 1980, 1985, 1990, 1992, 24 मे 2003 ते ऑगस्ट 2004 – (सार्वत्रिक) पोटनिवडणूक, अशा महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुका जिंकल्या. शिंदे हे जुलै 1992 ते मार्च 1998 या काळात महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून आले होते. 1999 मध्ये त्यांनी उत्तर प्रदेशातील अमेठी येथे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रचार व्यवस्थापक म्हणून काम केले.

2002 मध्ये, शिंदे यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार भैरोसिंग शेखावत यांच्या विरोधात लढत भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठीची निवडणूक हरली. 2003 ते 2004 पर्यंत त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. त्यांची 30 ऑक्टोबर 2004 रोजी आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी तामिळनाडूचे राज्यपाल सुरजित सिंग बर्नाला यांची जागा घेतली होती.

    follow whatsapp