Sushma Andhare : "आजचे फोटो बघितल्यानंतर त्या राक्षसांचे चेहरे...", संतोष देशमुखांचे फोटो पाहिल्यावर अंधारे हादरल्या

संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करताना सीआयडीच्या हाती एक महत्त्वाचा व्हिडिओ सापडला आहे. या व्हिडिओमध्ये सहा आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

• 10:09 AM • 04 Mar 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो समोर

point

संतोष देशमुख यांच्या हत्येनं महाराष्ट्र हादरला!

point

सुषमा अंधारे भावूक, काय म्हणाल्या?

Sushma Andhare : सुषमा अंधारे यांनीही अत्यंत भावनिक होत, संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे संपूर्ण फोटो व्हायरल झाल्यावर या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र अक्षरश: हादरला आहे. राक्षसासारखे हसणारे आरोपींचे फोटो पाहून संताप व्यक्त केला जातोय. बीडमध्ये बंदची हाक देण्यात आली असून, दुसरीकडे धाराशिवमध्येही बंद आहे. यावर आता सुषमा अंधारे यांनी सविस्तरपणे भावनिक प्रतिक्रिया आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Dhananjay Deshmukh : गृहमंत्रालयाला सगळे फोटो, सगळी घटना माहिती होती, एवढे दिवस का थांबले?

सुषमा अंधारे काय म्हणाल्या? वाचा त्यांच्याच शब्दात...

मी राक्षस बघितला नाही.. दंतकथेत त्याची वर्णन ऐकली वाचली आहेत.. पण आजचे फोटो बघितल्यानंतर त्या राक्षसांचे चेहरे कसे दिसत असतील त्याची कल्पना येतेय.. 
प्रचंड अस्वस्थ आहे... कितीही प्रयत्न केला तरी श्वास आणि मन अजूनही संतुलित करता येत नाही.. माझी ही अवस्था असेल तर ज्या माऊलीने लेकरू गमावले त्या मायमाऊलीचं काय..? 
इतकं क्रौर्य उरात घेऊन माणसा जगतात तरी कशी..? 
आपल्याकडे सत्ता असली पाहिजे सत्ता असल्यानंतर आपल्याला गोरगरिबांचे प्रश्न मांडता येतील त्यांच्या न्याय हक्कासाठी आवाज उठवता येईल असं वाटत होतं... पण संतोष अण्णाच्या बाबतीचे घडले ते बघितल्यानंतर माझ्याकडे सत्ता नाही याचा मला आनंद आणि समाधान वाटतय.. 
तुम्ही कुठला तो पिक्चर म्हणताय तो मी नाही बघितलेला.. पण कदाचित त्याच्यात सुद्धा औरंगजेबाच्या क्रौर्याची ही परिसीमा दाखवली नसेल.. 
इतका हिंसक आणि क्रूर विचार घेऊन ही माणसं जगत कशी असतील...
 ...यांच्या रक्तामासाच्या कुटुंबीयांना बोलताना भेटताना पोटच्या लेकराच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवताना त्या पोटच्या लेकराला अशा गिधाड्यांच्या हातात माया जाणवत असेल का.. की त्यांचंही अंग शहारून थरारून जात असेल.. 
आपला बाप भाऊ मुलगा इतका क्रूर आहे की त्याने प्रेमाने जरी पाठीवरून हात फिरवला तरी त्याची नखं आत रुतून जातील आणि आपण रक्तबंबाळ होऊन जाऊ हा विचार त्यांच्या लेकरांच्याही मनात येत असेल का... ? 
एवढं होऊनही बीड शांत आहे.. परळी शांत आहे.. परळीतली नेतेमंडळी शांत आहेत.. 
त्यांच्या शांत असण्याची कारण काहीही असू देत.. पण मी शांत आहे.. मी का शांत आहे.. मी दहशतीखाली आहे का.. मला सतत भीती वाटतेय का.. ? 
माणसांना संपवण्यासाठी ... दहशत वाढवण्यासाठी सत्ता हवी असेल तर आग लागो अशा सत्तेला... 
जळो तुमचं राजकारण.. जळो तुमचे डावपेच...  हा माझा प्रांत नाही... मला इतकं क्रूर व्हायचं नाही... 
मी माणूस आहे... अन् माझं माणूसपण या क्रूर राजकारणापेक्षा लाख मोलाच आहे... !!! 

हे ही वाचा >> Santosh Deshmukh Murder : क्रूरतेचा कळस! संतोष देशमुखांची अमानुष हत्या, सर्वात धक्कादायक फोटो आले समोर

दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करताना सीआयडीच्या हाती एक महत्त्वाचा व्हिडिओ सापडला आहे. या व्हिडिओमध्ये सहा आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. सहाही आरोपी अत्यंत क्रुरपणे संतोष देशमुख यांची कपडे काढून त्यांना मारहाण अमानुष मारहाण करत होते.सर्वात मोठी विकृती म्हणजे ही मारहाण सुरु असताना इतर आरोपी मोठमोठ्याने हसत त्यांच्या मारहाणीचा आनंद साजरा करत होते, असं या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलंय. 



 

    follow whatsapp